Farming Agricultural Business News Marathi agri inputs shop will open for three days washim Maharashtra | Agrowon

मालेगाव तालुक्यातील कृषी सेवा केंद्रे तीन दिवस सुरु राहणार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

वाशीम  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांकडून बियाणे, खते व कीटकनाशकांची होणारी मागणी लक्षात घेवून मालेगाव तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे प्रत्येक आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश तहसीलदार रवि काळे यांनी दिले आहेत.

वाशीम  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांकडून बियाणे, खते व कीटकनाशकांची होणारी मागणी लक्षात घेवून मालेगाव तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे प्रत्येक आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश तहसीलदार रवि काळे यांनी दिले आहेत.
 

बियाणे, खते यांचा समावेश जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मध्ये असल्याने या वस्तूंची विक्री करणारी दुकाने सुरु ठेवण्याबाबत नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. त्यानुसार मालेगाव तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

आठवड्यातील तीन दिवस विहित कालावधीत कृषी सेवा केंद्र सुरु असताना शेतकऱ्यांना उभे राहण्यासाठी दोन मीटर अंतरावर एक याप्रमाणे निशाणी आखावी. दुकानात गर्दी होवू नये, याची दक्षता घ्यावी. तसेच शेतकऱ्यांना हात धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था व हात निर्जंतुक करण्यासाठी सॅनिटायझर ठेवावेत. कोणत्याही परिस्थितीत आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी. संचारबंदीमध्ये राज्यातून किंवा परराज्यातून येणाऱ्या बियाणे, खते व कीटकनाशके यांची आयात सुरु राहिल, असे आदेश तहसीलदार श्री. काळे यांनी दिले आहेत.
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...