Farming Agricultural Business News Marathi cotton procure from one thousand farmers daily Akola Maharashtra | Agrowon

अकोला जिल्ह्यात आता दिवसाला हजार शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

अकोला  ः जिल्ह्यात कापूस खरेदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचली असून सातत्याने दबाव टाकल्यामुळे आता दिवसाला एक हजार शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस पावसाळ्यापुर्वी खरेदी होईल, अशी शक्यता वाढली आहे. याबाबत सुधारीत नियोजन प्रशासनाने केले आहे. सीसीआय तसेच कापूस पणन महासंघाच्या केंद्रावर वेगाने खरेदी करण्यात येणार आहे.

अकोला  ः जिल्ह्यात कापूस खरेदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचली असून सातत्याने दबाव टाकल्यामुळे आता दिवसाला एक हजार शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस पावसाळ्यापुर्वी खरेदी होईल, अशी शक्यता वाढली आहे. याबाबत सुधारीत नियोजन प्रशासनाने केले आहे. सीसीआय तसेच कापूस पणन महासंघाच्या केंद्रावर वेगाने खरेदी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात लॉकडाउन सुरु झाल्यापासून कापूस खरेदीचा वेग मंदावला होता. हजारो शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडलेला असताना काही दिवस केवळ ३० ते ४० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात होता. शेतकरी, लोकप्रतिनिधींनी सातत्याने खरेदी वाढविण्यासाठी दबाव तयार केला. याचा परिणाम आता दिसू लागला आहे. प्रशासनाने सध्या कार्यरत असलेल्या केंद्रांवर दिवसभरात हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाईल, असे नियोजन केले आहे.

सीसीआयच्या चिखलगाव (ता. अकोला) केंद्रावर २६ मे पर्यंत प्रतिदिवस १०० व त्यानंतर प्रतिदिवस ३०० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाईल. तर पातूर केंद्रावर ५०, बार्शीटाकळी केंद्रावर २९ मेपर्यंत १५०, अकोट येथे ३००, हिवरखेड (ता. तेल्हारा) येथे ५०, मूर्तिजापूर मध्ये १५०, बाळापूर केंद्रावर ५० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाईल.

कापूस पणन महासंघाच्या बोरगाव आणि कानशिवणी (ता. अकोला) केंद्रावर प्रतिदिवस १००, तेल्हारा केंद्रावर सध्या ५० व ग्रेडर उपलब्ध झाल्यानंतर २०० शेतकऱ्यांचा कापूस खरेदीचे नियोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारे सीसीआयच्या केंद्रांवर ८५० आणि पणन महासंघाच्या केंद्रांवर १५० असा मिळून १००० शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास अद्यापही तीन दिवस (ता.२६ मे) शिल्लक आहेत. जे शेतकरी कापूस विक्री करू इच्छितात त्यांनी तातडीने नोंदणी करण्याबाबत जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी आवाहन केले आहे.

सीसीआयची कापूस खरेदी केंद्रे : अकोला-चिखलगांव , पातूर, बार्शीटाकळी, अकोट, हिवरखेड ,मूर्तिजापूर,बाळापूर
कापूस फेडरेशनची केंद्रे : अकोला - बोरगांव/कानशिवणी,  तेल्हारा.


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...