मराठवाड्यात पीककर्ज पुरवठ्याचं घोडं अडलेलंच

२०१५ मध्ये घेतलेले पीककर्ज दोन्ही सरकारांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतरही माफ झाले नाही. ते माफ होईल की नाही, पुन्हा कर्ज मिळेल की नाही, हा प्रश्न कायम आहे. — सुधाकर बोंद्रे, शेतकरी, देवगाव, ता. पैठण जि. औरंगाबाद.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद  : कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात घोड अडलेलं असल्याचे चित्र आहे. जून महिना संपला तरी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत विविध बॅंकांनी उद्दिष्टाच्या केवळ २२ टक्केच पीककर्ज पुरवठा केला आहे. त्यामुळे खरीपपूर्वी पीककर्ज पुरवठा करण्याच्या घोषणेचे आणि धोरणाचे काय झाले, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामासाठी ११ हजार ९०४ कोटी ४४ लाख ७ हजार रुपयांचा पीक कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट जिल्हा सहकारी बॅंका, व्यापारी बॅंका व ग्रामीण बँकेला देण्यात आले होते. या उद्दिष्टाच्या तुलनेत २९ जून अखेरपर्यंत केवळ २२.६६ टक्के पीक कर्ज पुरवठ्याची उद्दिष्टपूर्ती करताना आठही जिल्ह्यांतील ५ लाख ३९ हजार ५०३ शेतकऱ्यांना २६९७ कोटी ७३ लाख ३९ हजार रुपयांचा पीक कर्जपुरवठा विविध बँकांनी केला.

आजवर झालेल्या कर्जपुरवठ्यात लातूर जिल्ह्यात सर्वाधिक ३५ टक्के, त्यापाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यात ३३ टक्के, जालन्यात २१ टक्के, उस्मानाबाद व बीडमध्ये प्रत्येकी २० टक्के, परभणीत १६, तर हिंगोली व नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी १४ टक्केच पीककर्ज पुरवठ्याची उद्दिष्टपूर्ती झाली आहे. प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीपूर्वी पीक कर्जपुरवठा होईल अशी आशा असते. यंदाच्या खरिपापूर्वी झालेल्या कर्जमाफीमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्याची आशा होती; परंतु तसे न झाल्याने शेतकऱ्यांवर अपेक्षित पीककर्जासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. जिल्हानिहाय उद्दिष्ट व प्रत्यक्ष कर्जपुरवठा (रुपये) :

  • औरंगाबाद जिल्हा 
  • उद्दिष्ट : ११९६ कोटी ८० लाख 
  • प्रत्यक्ष पुरवठा : ३९८ कोटी ३६ लाख 
  • टक्केवारी : ३३.२९ 
  • शेतकरी : ८१ हजार ३४६ 
  • जालना जिल्हा  
  • उद्दिष्ट :१११५ कोटी ३१ लाख ९० हजार 
  • प्रत्यक्ष कर्जपुरवठा : २३९ कोटी ६० लाख ६५ हजार 
  • टक्केवारी : २१.४८ 
  • शेतकरी संख्या : ५१ हजार ८४३ 
  •        परभणी जिल्हा 

  • उद्दिष्ट : १५६७ कोटी २० लाख 
  • प्रत्यक्ष कर्जपुरवठा : २६३ कोटी ७३ लाख
  • टक्केवारी : १६.८३
  • शेतकरी संख्या : ५६ हजार ७३७ 
  • हिंगोली जिल्हा 
  • उद्दिष्ट : ११६८ कोटी ९५ लाख 
  • प्रत्यक्ष कर्जपुरवठा : १६९ कोटी ८९ लाख ९१ हजार 
  • टक्केवारी : १४.५३ 
  • शेतकरी संख्या : ३४ हजार ११३ 
  • लातूर जिल्हा 
  • उद्दिष्ट :२२८३ कोटी ९४ लाख 
  • प्रत्यक्ष कर्जपुरवठा : ८१० कोटी ७६ लाख 
  • टक्केवारी : ३५.५० 
  • शेतकरी संख्या : १ लाख ७३ हजार ९२२ 
  • उस्मानाबाद जिल्हा 
  • उद्दिष्ट : १५९० कोटी ५५ लाख 
  • प्रत्यक्ष कर्जपुरवठा : ३२३ कोटी ६७ लाख 
  • टक्केवारी : २०.२५ 
  • शेतकरी संख्या : ५७ हजार ४०१ 
  • बीड जिल्हा 
  • उद्दिष्ट : ९५० कोटी 
  • प्रत्यक्ष कर्जपुरवठा : १९० कोटी २२ लाख 
  • टक्केवारी : २०.०२ 
  • शेतकरी संख्या : २७ हजार १८७ 
  • नांदेड जिल्हा 
  • उद्दिष्ट : २०३१ कोटी ३७ लाख 
  • प्रत्यक्ष कर्जपुरवठा : ३०१ कोटी ४६ लाख ५६ हजार 
  • टक्केवारी १४.८४ 
  • शेतकरी संख्‍या ५६ हजार ९५४ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com