Farming Agricultural Business News Marathi District banks arrears over twenty three thousand crore Solapur Maharashtra | Agrowon

जिल्हा बॅंकांची थकबाकी २३ हजार कोटींवर

तात्या लांडगे
शनिवार, 4 जुलै 2020

सोलापूर : राज्यात कर्जमाफी योजना लागू असली, तरी सद्य:स्थितीत राज्यातील ३९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांकडे २३ हजार १०२ कोटींची नवी थकबाकी वाढली आहे

सोलापूर : राज्यात कर्जमाफी योजना लागू असली, तरी सद्य:स्थितीत राज्यातील ३९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांकडे २३ हजार १०२ कोटींची नवी थकबाकी वाढली आहे. त्यामध्ये कर्जमाफीपूर्वी नियमित असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील ३० जिल्हा बॅंकांनी मागील वर्षी ३१ हजार ५२७ कोटी ४३ लाखांचे शेती व बिगरशेतीसाठी कर्जवाटप केले. मात्र, अतिवृष्टी, पूर, अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बॅंकांच्या कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे एकूण कर्जवाटपातील आठ हजार ४२५ कोटी ४० लाखांची कर्जवसुली झाली आहे. 

दरम्यान, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, नाशिक, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, बीड, बुलडाणा व नागपूर या जिल्हा बॅंकांनी मागील वर्षात शेती व बिगरशेतीसाठी १४ हजार ७६ कोटींचे कर्जवाटप केले. मात्र, त्यातून फक्‍त ७८१ कोटी ७८ लाखांचीच वसुली झाली आहे. दुसरीकडे लातूर, भंडारा, सातारा, चंद्रपूर, ठाणे, गडचिरोली आणि जळगाव या जिल्हा बॅंकांची वसुली ४१ टक्‍क्‍यांहून अधिक झाल्याचे राज्य बॅंकेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

कर्जवाटपासाठी स्वतंत्र अधिकारी
कर्जमाफीनंतरही शेती व बिगरशेती कर्जाची थकबाकी तथा येणेबाकी वाढू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर बहुतांश बॅंकांनी आता नियमांवर तंतोतंत बोट ठेवत शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्‍ती केली आहे. कर्जाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्षात जाऊन पिकांची पाहणी करणे, कर्जासाठी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणे, अशी कामे त्यांच्यावर सोपविण्यात आली आहेत.
 
जिल्हा बॅंकांची व्याप्ती

  • एकूण जिल्हा बॅंका  :  ३०
  • मागील वर्षी कर्जवाटप  : ३१,५२७.४३ कोटी
  • कर्जाची वसुली  : ८,४२५.४० कोटी
  • सर्व प्रकारच्या कर्जाची थकबाकी  : २३,१०२.०३ कोटी

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची शेती कर्जाची थकबाकी ६२७ कोटी आहे. कर्जमाफीनंतर बहुतांश शेतकरी नियमित कर्जदार झाले, परंतु कर्जमाफीपूर्वी नियमित कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांकडेच आता थकबाकी वाढली आहे. ‘कोरोना’मुळे रिझर्व्ह बॅंकेने ऑगस्टपर्यंत कर्ज वसुलीस मुदतवाढ दिल्याने ऑगस्टनंतर वसुली अपेक्षित आहे.
- शैलेश कोथमिरे, प्रशासक, सोलापूर जिल्हा बॅंक.


इतर अॅग्रो विशेष
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...