थोरात, विखे पाटील कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू 

 संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या असलेल्या राहाता तालुक्यातील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. विखे कारखान्याच्या निवडणुकीसाठी २९ ला तर थोरात कारखान्याच्या निवडणुकीसाठी १ मार्च मतदान होणार असल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून देण्यात आली. 

लोणी (ता. राहाता) येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी देशातील सहकारी तत्त्वावरील पहिला सहकारी साखर कारखाना उभारला.उभारणीपासून कारखान्यावर विखे परिवाराचे वर्चस्व आहे. सध्या खासदार डॉ. सुजय विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष आहे. आता कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक होत असून २९ फेब्रुवारीला मतदानाची तारीख निश्चित झालेली आहे. मात्र एकंदर परिस्थिती पाहता विखे कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या कारखाना कार्यक्षेत्रात ४५ संस्था प्रतिनिधी व १० हजार ५७२ ऊस उत्पादक सभासद मतदार आहेत. महसूलमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे कायम वर्चस्व असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ५७ संस्था प्रतिनिधी व १९ हजार ८५० ऊस उत्पादक सभासद आहेत. यावेळीही कारखान्यावर थोरात यांचेच वर्चस्व राहील अशी चर्चा आहे.

या दोन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून २१ संचालक निवडले जाणार आहेत. त्यात एक संस्था प्रतिनिधी, १५ सर्वसाधारण, अनुसूचित जाती- जमातीमधून १, दोन महिला, विमुक्त जाती, इतर मागास प्रवर्गातून प्रत्येकी एका संचालकाची निवड होईल, असे प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून सांगण्यात आले.    थोरात कारखान्याच्या निवडणुकीसाठी १५७ अर्ज सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखान्यातील २१ जागांसाठी १५७ उमेदवारांनी अर्ज भरलेले असून मंगळवारी (ता. १८) अर्ज  माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com