कोरोना तपासणीसाठी नेचर केअरतर्फे किआॅस्क संच भेट

विटा, जि. सांगली ः येथील नेचर केअर फर्टिलायझर्स आणि युथोपिया आॅर्गानिक कॉस्मेटिक्‍स, सातारा यांच्या वतीने सांगली, लातूर, गोवा येथील रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या तपासणीसाठी चार किआॅस्क संच भेट देण्यात आले. या संचामुळे रुग्णांच्या घशातील स्वॅब घेणे सोईचे होणार आहे. त्यामुळे ‘कोरोना’ची साथ पसरण्याचा धोका कमी होणार असून विषेश उपकरण नेचर केअरने जिल्हा प्रशासनाला सुपुर्द केले.
सांगली येथील शासकीय रुग्णालायत नेचर केअरच्यावतीने कोरोनाबाधित रुग्णांच्या तपासणीसाठी कियोस्क संच भेट देण्यात आला.

याबाबत जिल्हाधिकारी अभिजित चौधरी म्हणाले, की नेचर केअरने अंत्यत उपयुक्त मदत या ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाला केली आहे. कोव्हीड -१९ अनुमानितांचे स्वॅब घेताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये होणारे संक्रमण रोखण्याकरिता हे ग्लास किआॅस्क अत्यंत महत्वाचे काम करते. यासह नेचर केअर उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन आणि नेचर केअरचे संचालक बर्वे कुटुंबीयांचे योगदान यातून पंतप्रधान कोव्हिड सहाय्यता मदतनिधी व मुख्यमंत्री कोव्हिड सहायता मदत निधीसाठी प्रत्येकी ५१ हजार रुपयांचा निधीही प्रशासनाकडेही दिला.

यावेळी प्रांताधिकारी श्री. बर्गे, तहसीलदार शेळके, नेचर केअरचे चेअरमन जयंत बर्वे, कार्यकारी संचालक जयदेव बर्वे, युथोपिया आॅर्गानिक कॉस्मेटिक्‍सच्या संचालिका कामाक्षी बर्वे, प्रशासकीय अधिकारी अमृत कुलकर्णी आणि बर्वे कुटुंबीय तसेच नेचर केअरचे कर्मचारी उपस्थित होते.

या विशेष उपकरणाची उपयुक्तता लक्षात घेत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांनी नेचर केअर व बर्वे कुटुंबीयांचे कौतुक केले. सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी बर्वे कुटुंबियांचे अभिनंदन केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com