Farming Agricultural Business News Marathi Grain distribution on ration card Pune Maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात नागरिकांना रेशनकार्डवर धान्याचे वाटप सुरू

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 एप्रिल 2020

पुणे  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतून एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे एकत्रित आगाऊ धान्यवाटप जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना बुधवारपासून (ता.१) सुरू करण्यात आले आहे. एप्रिलसाठी ३८६८.५० टन गहू व २५४८ टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानांमध्ये पोहोच करण्‍यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.

पुणे  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतून एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे एकत्रित आगाऊ धान्यवाटप जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना बुधवारपासून (ता.१) सुरू करण्यात आले आहे. एप्रिलसाठी ३८६८.५० टन गहू व २५४८ टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानांमध्ये पोहोच करण्‍यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले, की मे व जून करिताचे ७७३७ टन गहू व ५०९६ टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांना १० एप्रिलपासून पुरविण्याचे नियोजन आहे. हे धान्य केवळ अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतील रेशन कार्डधारकांनाच वाटप करण्यात येणार आहे. सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी रेशन कार्डधारकांना धान्य वाटप करण्‍यासाठी निर्धारित वेळापत्रक तयार केले आहे.

एका निर्धारित वेळापत्रकात दहा कार्डधारक धान्य घेण्यासाठी येतील. सोशल डिस्टसिंगकरिता दुकानासमोर एक मीटर अंतर राखून मार्किंग करण्यात आले आहे.निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे कार्डधारकांना दुकानदार दूरध्वनीकरुन बोलवून घेतील. कार्डधारकांनी धान्य घेण्यासाठी गर्दी करु नये, याकरीता आवश्यकता भासल्यास पोलिस बंदोबस्त पुरवण्‍याबाबत पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना कळविण्यात आले आहे.

झोपडपट्टी भागात धान्य घरपोहोच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वस्तीत धान्यवाटपाचे निर्धारित वेळापत्रक ठरविले असून त्याप्रमाणे धान्य पाठवण्यापूर्वी कार्डधारकांना कळविण्‍यात येईल. कार्डधारकांच्या सोयीसाठी दुकानदारांना शासकीय अन्नधान्यासोबत इतर जीवनावश्यक वस्तू जसे डाळ, तेल, साखर, साबण, मीठ आदींची विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच रेशनकार्ड धारकांच्या तक्रार निवारणासाठी १०७७ हा टोल फ्री क्रमांक, तसेच ०२०- २६१२३७४३ हा मदत
केंद्र क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

साठेबाजी रोखण्यासाठी ११ पथके
जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी (ब्लॅक मार्केटिंग) रोखण्‍याकरीता परिमंडळनिहाय ११ पथकांव्दारे दररोज तपासणी करण्‍यात येत आहे. अन्नधान्य, भाजीपाला, दूध व औषधांची सद्यःस्थितीत एकूण २७ हजार २१० दुकाने सुरळीतपणे सुरु आहेत. सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही याकरिता बाजारसमिती, होलसेल व्यापारी, किराणा भुसार असोसिएशन, व्यापारी महासंघ यांच्‍याशी समन्वय ठेवण्‍यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...