Farming Agricultural Business News Marathi Illegal trucks stand at gram procurement center Nagar Maharashtra | Agrowon

शेवगावच्या खरेदी केंद्रावर कळंबमधील हरभऱ्याचे दोन ट्रक

सूर्यकांत नेटके
रविवार, 10 मे 2020

शेवगाव येथील नाफेड खरेदी केंद्रावर हरभरा भरलेले दोन ट्रक अनाधिकृतपणे उभे आहेत. त्यांच्या प्रवेशाची येथे नोंद नाही. कळंब येथून हे ट्रक आले असून आम्ही शुक्रवारी चौकशी केली. आम्ही मार्केटिंग फेडरेशनच्या वरिष्ठ कार्यालयाला कळवले आहे.
- श्रीकांत आभाळे, जिल्हा पणन अधिकारी, नगर.

नगर : शेतकऱ्यांच्या तूर, हरभरा, कापसाची तातडीने खरेदी करा, असे आवाहन सरकार करीत आहे. मात्र नगर जिल्ह्यात कापसासोबत तूर, हरभरा खरेदी केंद्रावरही बोगसगिरी केली जात असल्याचे उघड झाले आहे. शेवगाव येथील नाफेडच्या तूर, हरभरा खरेदी केंद्रावर गेल्या दोन दिवसापासून २६ टन हरभरा घेऊन आलेले दोन ट्रक उभे आहेत. हे ट्रक कळंब (जि. उस्मानाबाद) येथील असल्याचे सांगितले जात आहे.

बाजार समिती आवारात येतानाची त्यांची प्रवेशाची नोंद नाही. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हे ट्रक पकडले गेले. बाजार समिती, खरेदी केंद्राने मात्र आता या ट्रकबाबत कानावर हात ठेवल्याने जिल्हा मार्केटींग फेडरेशनने मुंबईच्या वरिष्ठ कार्यालयाला याबाबत कळवले आहे.

कळंबचे हे ट्रक शेवगावच्या खरेदी केंद्रावर आल्याच कशा याची तहसीलदार, पोलिस आता चौकशी करुन पुढील कारवाई करणार आहेत. मात्र शेवगाव तालुक्यातच असे प्रकार होत असल्याने खरेदी केंद्र, बाजार समितीत मिलीभगत असल्याचे दिसून येत आहे.

शेवगाव येथील खरेदी केंद्रावर दोन दिवसांपूर्वी कळंब येथून हरभरा भरलेला व नोंदणी नसलेले दोन ट्रक आले. ट्रक येथून हलवू नयेत यासाठी कार्यकर्त्यांनी रात्रभर जागता पहारा दिला. शुक्रवारी मार्केटींग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. मात्र, त्या ट्रकबाबत बाजार समिती, खरेदी केंद्राने हात वर केले. आता महसूल प्रशासन आणि पोलिस चौकशी करुन पुढील कारवाई करणार आहेत.
 
खरेदी केंद्राची चौकशी करण्याची मागणी

शेतकऱ्यांच्या तूर, हरभऱ्याची खरेदी करण्यासाठी सुरु असलेल्या केंद्रावर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे. शेवगाव येथे उभ्या असलेल्या ट्रकमधील हरभरा जर येथे खरेदी केला जाणार नव्हता तर मग ट्रक येथे आलेच कसे हा प्रश्नच आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेकडो क्विंटल कापूस ज्या शेतकऱ्यांच्या नावे विकला त्याच शेतकऱ्यांच्या नावे मोठ्या प्रमाणात तूर खरेदी झालेली आहे. त्यामुळे येथे झालेल्या तूर, हरभरा आणि चापडगावच्या कापूस खरेदी केंद्रावरील खरेदीची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे यांच्यासह शेतकरी संघटना व शेतकरी करत आहेत. दोन वर्षांपुर्वी पाथर्डी तालुक्यातील केंद्रावर असाच प्रकार घडला होता.
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...