Farming Agricultural Business News Marathi milk purchase rate decrease Jalgaon Maharashtra | Agrowon

जळगावात खासगी डेअरी चालक, विक्रेत्यांकडून दूध खरेदी दरात घट

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

जळगाव  ः जिल्ह्यात दुधाच्या वितरणात येणाऱ्या अडचणी, दुग्धजन्य पदार्थांना कमी मागणी व मजुरीबाबतच्या समस्या लक्षात घेता खासगी डेअरी चालक, विक्रेत्यांनी शेतकऱ्यांकडील दूध खरेदीचे दर मागील दोन दिवसांत कमी केले आहेत. गायीच्या दूधाचे खरेदीदर तब्बल आठ ते नऊ रुपये प्रतिलिटरने कमी करण्यात आले आहेत. म्हशीच्या दुधाचे खरेदीदरही सात ते आठ रुपये लिटरने कमी झाल्याची माहिती आहे.

जळगाव  ः जिल्ह्यात दुधाच्या वितरणात येणाऱ्या अडचणी, दुग्धजन्य पदार्थांना कमी मागणी व मजुरीबाबतच्या समस्या लक्षात घेता खासगी डेअरी चालक, विक्रेत्यांनी शेतकऱ्यांकडील दूध खरेदीचे दर मागील दोन दिवसांत कमी केले आहेत. गायीच्या दूधाचे खरेदीदर तब्बल आठ ते नऊ रुपये प्रतिलिटरने कमी करण्यात आले आहेत. म्हशीच्या दुधाचे खरेदीदरही सात ते आठ रुपये लिटरने कमी झाल्याची माहिती आहे.

खासगी डेअरीचालक, गावांमधून दूध खरेदी करून शहरात विक्री करणारे किरकोळ विक्रेते, डेअरीचालक गायीचे दूध २९ ते ३१ रुपये लिटर या दरात शेतकऱ्यांकडून खरेदी करीत होते. म्हशीच्या दुधाची खरेदी ४१ ते ४५ रुपये प्रतिलिटर या दरात खरेदी केली जात होती. शहरात तसेच विविध भागांत ग्राहकांना ५५ ते ६० रुपये लिटर या दराने म्हशीच्या दुधाची विक्री केली जात होती. गायीच्या दुधाची विक्री ४२ ते ४५ रुपये प्रतिलिटर या दरात केली जात होती.

सध्या विक्री दर खासगी डेअरीचालक, किरकोळ विक्रेत्यांनी कमी केलेले नाहीत. परंतु शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाचे दर कमी करण्यात आले आहेत. त्यात म्हशीच्या दुधाची खरेदी ३८ ते ३५ रुपये लिटर या दरात आणि गायीच्या दुधाची खरेदी २३ ते २४ रुपये लिटर या दराने केली जात आहे. इंधन मिळण्यातील अडचणी, वाढती मजुरी, मजुरांचा अभाव व दुग्धजन्य पदार्थ वितरण, विक्रीची विस्कळीत साखळी, अशी कारणे खासगी डेअरीचालक दूध खरेदी दर कमी करण्यामागे देत आहेत. जिल्ह्यात सुमारे चार लाख लिटर दूध खरेदी विक्रीची उलाढाल खासगी डेअरी चालक, किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून होत असते.

जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे खरेदी व विक्री दर स्थिर आहेत. सध्या सव्वातीन लाख लिटर दूध संकलन असून, त्यात घट झालेली नाही. परंतु विक्री मागील काही दिवसांत प्रतिदिन ५० हजार लिटरने कमी झाली आहे. संघाच्या दुधासह दुग्धजन्य पदार्थांची विक्री बुलडाणा, नाशिक, औरंगाबाद, अकोला येथेही केली जाते. रोज दिड लाख लिटर दुधाची विक्री होत होती. ती सध्या एक लाख लिटरपर्यंत होत आहे. जळगाव शहरासह इतर भागात दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीची दुकाने सकाळी व सायंकाळीच सुरू असतात. ती २४ तास सुरू राहायला हवीत, असे मत दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी व्यक्त केले.

जे दूध अतिरिक्त ठरत आहे, त्यापासून लोणी, पावडर तयार करीत आहोत. त्यासाठी आवश्‍यक सामग्री, निर्मिती खर्च वाढला आहे. त्याचा साठाही वाढू लागला आहे, असेही श्री. लिमये म्हणाले.
 


इतर ताज्या घडामोडी
पीककर्ज द्या, वीजबिल माफ करा,...सोलापूर  ः शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया...
जालन्यात सव्वा लाख क्विंटलवर कापूस...जालना : जिल्ह्यात कापूस खरेदीची एकूण ८...
औरंगाबाद जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व कपाशी...औरंगाबाद : जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात...
पुणे बाजार समितीत शेतीमालाची आवक तुरळकचपुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु...
निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः निसर्ग चक्रीवादळ आणि अति पावसाचा...
नुकसानग्रस्तांना मदतीबाबत योग्य तो...पुणे  ः निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे...
मंजुर येथील बंधाऱ्याचा भराव पहिल्याच...नगर  ः मंजुर (ता.कोपरगाव) येथील कोल्हापुर...
जत तालुक्‍याच्या पूर्व भागात चारा टंचाईसांगली  ः पावसाने दिलेली दडी, वाया गेलेला...
भुईबावडा परिसरातील तीन गावांना ...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील भुईबावडा (ता.वैभववाडी)...
निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी...रत्नागिरी  : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले...
अकोल्यात कंटेनमेंट झोन वाढणार नाहीत...अकोला  ः अकोल्यात कोरोना बाधितांची वाढत...
कर्नाटकी बेंदुरावर कोरोनाचे सावटकोल्हापूर:  कर्नाटकी बेंदूर उद्या (ता.७)...
अटींवरच शेतकऱ्यांना वर्ध्यात कापूस...वर्धा  ः वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या...
चंद्रपूर जिल्ह्यात पंधरा हजारांवर ...चंद्रपूर ः शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची हमी राज्य...
शेतकऱ्यांना प्रतीक्षा फळपीक विमा...नगरः मृगबहारासाठी पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत...
पुणे जिल्ह्यातील गावांतील आठवडे बाजार...पुणे: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अडीच...
माती परीक्षणानुसार करा खतांचे नियोजनमाती परीक्षण हा पीक उत्पादनाचा आत्मा आहे. आगामी...
सुधारित तंत्राने करा शेवगा लागवडलागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील अंतर २.५ ते ३...
भात पुर्नलागवडीची चारसूत्री पद्धतीसूत्र १  भातपिकाच्या अवशेषांतील (तुसाचा व...
हिंगोलीत हळद ४८०० ते ५२०० रुपये...हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...