Farming Agricultural Business News Marathi opposition party leader demand of compensation nagpur maharashtra | Agrowon

अवकाळीग्रस्तांना हेक्टरी २५ हजारांची मदत द्या : देवेंद्र फडणवीस

टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 डिसेंबर 2019

नागपूर : ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत तातडीने द्यावी, अशी मागणी करतानाच तुम्ही शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळा, अशी आठवण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला करून दिला. 

नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.१५) विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी मंत्री नसलेल्या सरकारचा चहाच नको, असे म्हणत फडणवीस यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा विरोधी पक्षाचा निर्णय जाहीर केला. 

नागपूर : ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत तातडीने द्यावी, अशी मागणी करतानाच तुम्ही शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळा, अशी आठवण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला करून दिला. 

नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.१५) विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी मंत्री नसलेल्या सरकारचा चहाच नको, असे म्हणत फडणवीस यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा विरोधी पक्षाचा निर्णय जाहीर केला. 

पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे, बबनराव पाचपुते, महादेव जानकर आदी नेते उपस्थित होते. पत्रकार परिषदेआधी या नेत्यांची बैठकही पार पडली. अधिवेशनात राज्य सरकारला घेरण्याची रणनीती या बैठकीत निश्चित करण्यात आल्याचे समजते. बैठकीकडे नाराज भाजप नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता आदी नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. तसेच सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार हे दोन नेतेही दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

या वेळी श्री. फडणवीस म्हणाले, की सरकारचा शपथविधी होऊन अनेक दिवस लोटले तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. तिन्ही पक्षांतील विसंवादामुळे खातेवाटप झालेले नाही. खातेवाटप न झाल्याने उत्तर कोण देणार माहीत नाही. नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार न करण्यातून सरकार या अधिवेशनाबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते.

आमचे काळजीवाहू सरकार असताना अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात निर्णय घेतला होता. सरकार स्थापन झाल्यानंतर पुढील मदत करू असेही म्हटलो होतो. त्या वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत कमी असून, शेतमालाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये, तर फळबागायतदार शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी केली होती. त्यांनीच केलेल्या मागणीची आम्ही आठवण करून देत आहोत, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले. 

तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले असले तरी शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भातला निर्णय झालेला नाही. मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांविषयी चर्चादेखील झालेली नाही. सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा होती, पण अद्याप मिळालेली नाही. त्याचबरोबर महाविकास आघाडीने सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले आहे. ते कधी करणार आहात, असा सवाल करून किमान तूर्तास त्याचा कार्यक्रम तरी अधिवेशनात सरकारने जाहीर करायला हवा. पण सरकार वेळकाढूपणा करत आहे, अशी टीका श्री. फडणवीस यांनी केली.

हे सरकार स्थगिती सरकार आहे. आमच्या कार्यकाळात सुरू झालेल्या कामांना स्थगिती दिल्यामुळे ग्रामीण भागात मोठा असंतोष पसरला आहे. विकासकामांना स्थगिती दिल्यामुळे गुंतवणुकीवर परिणाम होत आहे. त्यामुळे स्थगिती दिलेली कामे तात्काळ सुरू करावीत, अशी मागणीही श्री. फडणवीस यांनी केली. गेल्या सरकारमध्ये शिवसेना आमच्यासोबत होती, तेव्हा घेतलेले सर्व निर्णय शिवसेनेच्या संमतीने घेतले होते. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते सेनेकडून ते निर्णय चुकीचे होते असे वदवून घेत आहेत. आधीच्या कॅबिनेटचा एखादा निर्णय चुकला असेल, तरीही त्याची जबाबदारी भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेचीही आहे, असेही श्री. फडणवीस म्हणाले.
 
‘सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्ज घ्यावे’
जाहीर केलेल्या घोषणांबाबत भविष्यात हात वर करता यावेत म्हणून सरकार राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चुकीची माहिती पसरवत आहे. राज्याची आर्थिक स्थिती इतर राज्यांपेक्षा चांगली आहे. महाराष्ट्र अजूनही २७ लाख कोटींपर्यंत कर्ज घेऊ शकतो, असा दावा श्री. फडणवीस यांनी केला. आपण जीडीपीच्या २६ टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकतो. सध्या राज्याने जीडीपीच्या १५ टक्के कर्ज घेतले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्ज घ्यावे. अडचण असल्यास सरकारने आमच्याशी चर्चा करावी, आम्ही सरकारला कर्ज कसे घ्यायचे ते सांगू. तसेच आम्ही कधीही केंद्र सरकारच्या मदतीची वाट पाहिली नाही, राज्याच्या तिजोरीतून मदत वितरीत केली. मात्र, राज्य सरकार टाळाटाळ करीत आहे, असा आरोपही श्री. फडणवीस यांनी केला. 


इतर ताज्या घडामोडी
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम...
थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...
केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...