Farming Agricultural Business News Marathi regular arrival of fertilizers in district Kolhapur Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात खतांची नियमित आवक

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 एप्रिल 2020

कोल्हापूर  : जिल्ह्यात खतांच्या रेक नियमित येत असल्याने या महिनाअखेर पर्यंत युरियासह मुबलक खते शेतकऱ्यांना मिळतील, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

कोल्हापूर  : जिल्ह्यात खतांच्या रेक नियमित येत असल्याने या महिनाअखेर पर्यंत युरियासह मुबलक खते शेतकऱ्यांना मिळतील, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

श्री. पाटील म्हणाले, की सध्या शेतीकामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांकडून विविध खतांची सातत्याने मागणी होत आहे. काही ठिकाणी युरियाची टंचाई होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. परंतु, आवश्यक त्या प्रमाणात रेल्वेने खते कोल्हापुरात येत असून या महिन्यात खते प्रमाणात शेतकऱ्यांना मिळतील.

लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांची खतांची गरज भागविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. सध्या एप्रिल महिन्याची विविध रासायनिक खतांची गरज ही १५ हजार टन असून शासनाकडून जिल्ह्याकरिता १५,९५८ टन खतांचा पुरवठा झाला आहे. सध्या जिल्ह्यात युरिया, डीएपी, संयुक्त व मिश्र खते मिळून सुमारे १६,५६५ टन खते वाटपासाठी उपलब्ध झालेली आहेत. शनिवारी (ता.२५) आयपीएल कंपनीकडून १३२४ टन एमओपी खते उपलब्ध झालेली आहेत. बुधवारअखेर (ता. २९) एकूण ७७९० टन रासायनिक खते जिल्ह्यासाठी प्राप्त होणार आहे. त्यामुळे रासायनिक खाते पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार असल्यामुळे टंचाईची परिस्थिती निर्माण होणार नाही.

एखाद्या विशिष्ट कृषी सेवा केंद्रामध्ये खतांचे सर्व ग्रेड प्रकार कदाचित उपलब्ध नसतील, मात्र नजीकच्या दुसऱ्या कृषी केंद्रावर निश्चितपणे खते उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणताही संभ्रम निर्माण करू नये. असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...