नगर जिल्ह्यात ६७ हजार क्विंटल तूर खरेदी

नगर ः जिल्ह्यात आतापर्यंत बारा खरेदी केंद्रांवर ६६ हजार सातशे क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या सर्व १६ हजार ४८१ शेतकऱ्यांनी तूर विक्रीला आणावी यासाठी संदेश दिलेले आहेत. गुरुवारपर्यंत (ता.३०) खरेदी सुरु राहणार आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत बारा खरेदी केंद्रांवर ६६ हजार सातशे क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या सर्व १६ हजार ४८१ शेतकऱ्यांनी तूर विक्रीला आणावी यासाठी संदेश दिलेले आहेत. गुरुवारपर्यंत (ता.३०) खरेदी सुरु राहणार आहे.

शेतकऱ्यांच्या तुरीला हमीदर मिळावा यासाठी नाफेडने हमीभावाने खरेदी केंद्रे सुरु केली आहेत. जिल्ह्यात राहुरी, पाथर्डी, शेवगाव, पारनेर, नगर, जामखेड, कर्जत, खर्डा (जामखेड), श्रीगोंदा, मिरजगाव (कर्जत) व नेवासा, टाकळी खांडेश्वरी या बारा ठिकाणी खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाउन झाल्यानंतर पहिल्या दोन दिवस खरेदी केंद्रे बंद राहिली, मात्र त्यानंतर खरेदी सुरुच ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

तूर विक्रीसाठीची १५ एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याची मुदत होती. त्याआधी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. एकूण १६ हजार ४८१ शेतकऱ्य़ांनी नोंदणी केली आहे. त्यातील १० हजार ८२६ शेतकऱ्यांकडून ६६ हजार ७०६ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. आता ३० एप्रिलपर्यंत खरेदी सुरु राहणार आहे. सर्व शेतकऱ्यांना संदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे सहा दिवसांत जे शेतकरी येतील त्यांची तूर खरेदी केली जाईल. त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांनी अन्य ठिकाणी तूर विक्री केल्याचे गृहीत धरुन केंद्रे बंद होणार असल्याचे सांगण्यात आले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तूर खरेदीचा वेगही कमी आहे. केंद्रनिहाय खरेदीची स्थिती (कंसात विक्री करणारे शेतकरी)

  • शेवगाव ः १८,६८७ (२९२१)  
  • मिरजगाव ः २०२४ (३६५)
  • राहुरी ः १११० (२१८)
  • पाथर्डी ः ८५२५ (१४२१)
  • पारनेर ः ४६५ (९६)
  • नगर ः ४००५ (७१०)
  • कर्जत ः ११,०५४ (१७६३)
  • खर्डा ः ४११२ (५९१)
  • नेवासा ः २०५१ (३४८)
  • श्रीगोंदा ः ६५३ (९७)
  • जामखेड ः ५१०९ (८७४)
  • टाकळी खंडेश्वरी ः ८९०७ (१४२२)
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com