नगर जिल्ह्यात रोज २६ लाख लिटर दूध संकलन

नगर ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा फटका सर्वच व्यवसायांना बसला आहे. या ‘कोरोना’ची झळ आता शेतकऱ्यांनाही बसू लागली आहे. सध्या जिल्ह्यात दररोज २६ लाख लिटर दूध संकलन होत आहे. शहरात संचारबंदी असल्याने दूध विक्रेत्यांना तेथे येऊ दिले जात नसल्याने रोजच्या रतीबांची संख्या कमी झाली असून दूध व्यावसायिक खासगी डेअरींमध्ये दूधाची विक्री करीत होते. परंतु, तेथेही आता दूध दरात कपात करण्यात आल्याने शेतकरी सहकारी दूध संघांकडे वळाले आहे. परंतू, या दुधाचे करायचे काय असा प्रश्न आता सहकारी दूध संघांना पडला आहे.
संग्रहित छायाचित्र

‘कोरोना’ने संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. याचा फटका आता शेतकऱ्यांना बसू लागला आहे. शेतीमाल खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करण्याची वेळ आली आहे. त्यापाठोपाठ शेतकऱ्यांवर आता दुधाचे संकट कोसळले आहे. जिल्ह्यात रोज सुमारे २६ लाख लिटर दुधाचे संकलन होते. त्यातील काही दूध दैनंदिन दूध उत्पादक घरोघरी जाऊन घालत असतात तर काही दूध खासगी व सहकारी दूध संकलन केंद्रांवर घालतात. त्यात घरोघरी दुधाचे रतीब घालण्यात संचारबंदीची आठकाठी येत असल्याने दूध उत्पादकांनी खासगी दुध केंद्रांवर दूध घालण्यास सुरवात केली होती.

परंतु ,अचानक दुधाचे संकलन वाढल्यामुळे तेथेही आता दूध दरात घसरण झाली आहे. त्यामुळे दुध उत्पादकांनी आता आपला मोर्चा सहकारी दूध संघांकडे वळवला असून तेथे दुध घालण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुधाला मागणी कमी झाल्याने येणाऱ्या एवढ्या दुधाचे करायचे काय असा प्रश्न सहकारी दूध संघाच्या व्यवस्थापनांस पडला आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सहकारी दूध संघांकडूनही दुधाची खरेदी कमी करण्याच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने सहकारी दुध संघांकडील दुधाची खरेदी करावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.  

सरकारने दूध खरेदी करावी ः परजणे खासगी दूध संकलन केंद्र चालकांनी दुधाचे भाव कमी केले आहेत. त्यामुळे सहकारी दुध संघांकडील दुध संकलनात वाढ झाली आहे. मात्र दुग्धजन्य पदार्थांना मागणी कमी असल्याने जास्त दुधाचे करायचे काय असा प्रश्न आता सहकारी दूध संघांना पडला आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने सहकारी दूध संघांकडील दूध खरेदी करावे, अशी मागणी गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com