Farming Agricultural Business News Marathi twenty six lack liter milk collection Nagar Maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात रोज २६ लाख लिटर दूध संकलन

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

नगर  ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा फटका सर्वच व्यवसायांना बसला आहे. या ‘कोरोना’ची झळ आता शेतकऱ्यांनाही बसू लागली आहे. सध्या जिल्ह्यात दररोज २६ लाख लिटर दूध संकलन होत आहे. शहरात संचारबंदी असल्याने दूध विक्रेत्यांना तेथे येऊ दिले जात नसल्याने रोजच्या रतीबांची संख्या कमी झाली असून दूध व्यावसायिक खासगी डेअरींमध्ये दूधाची विक्री करीत होते. परंतु, तेथेही आता दूध दरात कपात करण्यात आल्याने शेतकरी सहकारी दूध संघांकडे वळाले आहे. परंतू, या दुधाचे करायचे काय असा प्रश्न आता सहकारी दूध संघांना पडला आहे.

नगर  ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा फटका सर्वच व्यवसायांना बसला आहे. या ‘कोरोना’ची झळ आता शेतकऱ्यांनाही बसू लागली आहे. सध्या जिल्ह्यात दररोज २६ लाख लिटर दूध संकलन होत आहे. शहरात संचारबंदी असल्याने दूध विक्रेत्यांना तेथे येऊ दिले जात नसल्याने रोजच्या रतीबांची संख्या कमी झाली असून दूध व्यावसायिक खासगी डेअरींमध्ये दूधाची विक्री करीत होते. परंतु, तेथेही आता दूध दरात कपात करण्यात आल्याने शेतकरी सहकारी दूध संघांकडे वळाले आहे. परंतू, या दुधाचे करायचे काय असा प्रश्न आता सहकारी दूध संघांना पडला आहे.

‘कोरोना’ने संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. याचा फटका आता शेतकऱ्यांना बसू लागला आहे. शेतीमाल खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करण्याची वेळ आली आहे. त्यापाठोपाठ शेतकऱ्यांवर आता दुधाचे संकट कोसळले आहे. जिल्ह्यात रोज सुमारे २६ लाख लिटर दुधाचे संकलन होते. त्यातील काही दूध दैनंदिन दूध उत्पादक घरोघरी जाऊन घालत असतात तर काही दूध खासगी व सहकारी दूध संकलन केंद्रांवर घालतात. त्यात घरोघरी दुधाचे रतीब घालण्यात संचारबंदीची आठकाठी येत असल्याने दूध उत्पादकांनी खासगी दुध केंद्रांवर दूध घालण्यास सुरवात केली होती.

परंतु ,अचानक दुधाचे संकलन वाढल्यामुळे तेथेही आता दूध दरात घसरण झाली आहे. त्यामुळे दुध उत्पादकांनी आता आपला मोर्चा सहकारी दूध संघांकडे वळवला असून तेथे दुध घालण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुधाला मागणी कमी झाल्याने येणाऱ्या एवढ्या दुधाचे करायचे काय असा प्रश्न सहकारी दूध संघाच्या व्यवस्थापनांस पडला आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सहकारी दूध संघांकडूनही दुधाची खरेदी कमी करण्याच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने सहकारी दुध संघांकडील दुधाची खरेदी करावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
 

सरकारने दूध खरेदी करावी ः परजणे
खासगी दूध संकलन केंद्र चालकांनी दुधाचे भाव कमी केले आहेत. त्यामुळे सहकारी दुध संघांकडील दुध संकलनात वाढ झाली आहे. मात्र दुग्धजन्य पदार्थांना मागणी कमी असल्याने जास्त दुधाचे करायचे काय असा प्रश्न आता सहकारी दूध संघांना पडला आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने सहकारी दूध संघांकडील दूध खरेदी करावे, अशी मागणी गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवले आहे.
 


इतर बातम्या
टोळधाडीचा राजस्थानमधील ९० हजार हेक्टरला...जयपूर, राजस्थान  ः राज्यातील २० जिल्ह्यांतील...
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
यंदा पायी वारी नाही; दशमीला पंढरीत...पुणे : आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्य शासन...
कापूस खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवा...जळगाव : शासकीय कापूस खरेदीला गती देण्यासाठी...
जळगाव जिल्ह्यात मका, ज्वारी खरेदीसाठी...जळगाव : जिल्ह्यात शासकीय केंद्रात हमीभावात मका व...
नांदेडमध्ये पीककर्जाच्या ऑनलाइन...नांदेड : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १७ लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
शेतकऱ्यांनो पीक कर्जाबाबत निश्चित राहा...नाशिक : ‘‘महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत...
कपाशी लागवडीसाठी जायकवाडीचे आवर्तन सोडा...परभणी : जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या, उजव्या...
जालन्यातील ७६२ तूर उत्पादकांना...जालना : जिल्ह्यातील सहा हमी दर खरेदी केंद्रांवरून...
थकीत एफआरपी द्या ः बळीराजा शेतकरी संघटनासातारा : कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले...
इंदापुरात मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी...पुणे ः इंदापूर तालुका कृषी उत्पत्र बाजार...
चांदोरीत शॉर्टसर्किटमुळे १० एकर ऊस खाक चांदोरी, जि. नाशिक : निफाड तालुक्यातील चांदोरी...
पुणे बाजार समिती उद्यापासून सुरू होणारपुणे ः कोरोना टाळेबंदीमुळे गेली सुमारे दीड...
सोलापुरात खते, बियाणे थेट शेतकऱ्यांच्या...सोलापूर : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना थेट...
स्थलांतरित मजूरांना ‘रोहयो’तून कामे...यवतमाळ ः राज्याच्या इतर जिल्ह्यातील मजूर आपापल्या...
अमरावतीत २५ जिनींगव्दारे कापूस खरेदीअमरावती ः खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर कापूस खरेदीला...
औरंगाबादमध्ये खरिपातील बियाणे विक्री...औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
बाजार समित्यांनी सीसीआयला मनुष्यबळ...वर्धा ः सीसीआयकडे आवश्‍यक ग्रेडर कमी आहेत....
टोळधाडबाधीत क्षेत्रातील मदतीचे प्रस्ताव...अमरावती ः जिल्ह्यात टोळधाडीच्या झुंडीने केलेल्या...