Farming agricultural Business Onion auction again in an open manner Nashik maharashtra | Agrowon

 कांदा लिलाव पुन्हा खुल्या पद्धतीने; नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी निर्णय

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 एप्रिल 2020

 गोण्यांची उपलब्धता, वाढलेला खर्च यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करुन गोणी पद्धतीऐवजी खुल्या पद्धतीने कांदा लिलाव करण्याचे आदेश संबंधित बाजार समित्यांना दिले असून कार्यवाही सुरू झाली आहे.
— गौतम बलसाने, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक.

नाशिक  : जिल्ह्यात ‘कोरोना’ची पार्श्वभूमी बघता होणारी गर्दी तसेच मजूरटंचाईमुळे बाजार समित्यांमध्ये होणाऱ्या कांदा लिलावात अडचणी येत होत्या. हा तिढा सोडवण्यासाठी बाजार समित्यांनी तोडगा काढत गोणी पद्धतीने कांदा लिलावाला सुरुवात केली. मात्र त्यास शेतकऱ्यांचा विरोध होऊ लागल्याने पुन्हा लिलाव खुल्या पद्धतीने सुरू झाले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गौतम बलसाने यांनी बाजार समिती प्रशासनाला दिले आहेत. 

गोणी पद्धतीने कांदा लिलाव सुरू असल्याने शेतकऱ्यांना प्रतिगोणीमागे ४० रुपये अतिरिक्त खर्च तसेच वेगळी मजुरी द्यावी लागत असे. त्यामुळे प्रतिक्विंटलमागे १०० रुपयांपेक्षा खर्च वाढूनही अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने पणन संचालकांकडे खुल्या पद्धतीने लिलाव सुरू करण्याबाबत निवेदन सादर केले होते. तसेच शेतकऱ्यांनी देखील ही मागणी लावून धरली होती. अखेर ही मागणी विचारत घेत खुल्या पद्धतीने कांदा लिलाव सुरू झाले आहे. मात्र, दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण कायम आहे. 

जिल्ह्यातील बाजार समित्यांनी खुल्या पद्धतीने कांदा लिलाव करण्याचे स्वीकारले आहे. मात्र लासलगाव बाजार समितीने मजूर टंचाईचे कारण देत मंगळवारपर्यंत(ता.१४) गोणी पद्धतीने लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लासलगाव बाजारसमितीतही लवकरच खुल्या पद्धतीने लिलाव करावा अशी कांदा उत्पादकांची मागणी आहे. 

नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव खुल्या पद्धतीने करण्याचे निर्णयाचे स्वागत आहे. मात्र शेतकऱ्यांना वेठीस धरून गोणी पद्धतीने लिलावाचा निर्णय नको. यासाठी शेतकऱ्यांना विचारात घ्यायला हवे, असे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष
भारत दिघोळे यांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...