Farming agricultural Business onion auction remain close Nagar Maharashtra | Agrowon

नगर, पारनेर, नेवासेत कांदा लिलाव बंदच

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मे 2020

नगर  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर बंद करण्यात आलेले नगर जिल्ह्यामधील नगर पारनेर, नेवासेसह बहूतांश बाजार समित्यांमधील कांदा लिलाव अजूनही बंदच आहेत. जेथे लिलाव सुरु आहेत. तेथेही अपेक्षित दर नसल्याने फारशी आवक होत नाही. भाजीपाला, भुसारची आवकही जेमतेमच असल्याची जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील स्थिती आहे.

नगर  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर बंद करण्यात आलेले नगर जिल्ह्यामधील नगर पारनेर, नेवासेसह बहूतांश बाजार समित्यांमधील कांदा लिलाव अजूनही बंदच आहेत. जेथे लिलाव सुरु आहेत. तेथेही अपेक्षित दर नसल्याने फारशी आवक होत नाही. भाजीपाला, भुसारची आवकही जेमतेमच असल्याची जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील स्थिती आहे.

जिल्ह्यातील नगर, घोडेगाव (नेवासा), पारनेर, राहाता, राहुरी, कोपरगाव, संगमनेर, कोपरगाव या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव होत असतात. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरु झाल्यानंतर बाजार समित्या बंद करुन कांदा लिलाव थांबवण्यात आले होते. नगर बाजार समितीत सर्वाधिक कांद्याची आवक होत असते. त्यामुळे मध्यंतरी दोन वेळा कांदा लिलाव सुरु करण्याचे प्रयत्न झाले. मात्र गर्दी होत असल्याने हे लिलाव बंद करण्यात आले. सध्या उत्तर भारतात कांद्याला मागणी नसल्याने येथे दर मिळत नाही. व्यापारीही कांदा खरेदी करण्याला धजावत नाहीत.

‘कोरोना’मुळे वाहतुकीलाही अडचणी येत आहेत. त्यामुळे नगर, पारनेर, नेवासेत कांदा लिलाव बंद आहेत. संगमनेर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तेथील बाजार समितीत कांद्यासह सर्वच व्यवहार बंद आहेत. राहाता, राहुरी, कोपरगावला लिलाव सुरु आहेत. मात्र कांद्याला दर नसल्याने तेथेही फारशी आवक होत नाही. बहूतांश ठिकाणी शेतकरीही यायला धजावत नाहीत असे नगर बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

भाजीपाला व भुसारची आवक मात्र सुरु असली तरी पन्नास टक्क्यांच्या जवळपास भुसारच्या आवकेत घट झाली आहे. काही ठिकाणी बाजार समित्यांत सर्व लिलाव सुरु करण्याची मागणी आहे. मात्र गर्दी होणार नाही याबाबत दक्षता घेऊनच बाजार समिती सुरु करण्याबाबत नियोजन सुरु आहे. साधारण ३० मे नंतर ‘कोरोना’बाबत उपाययोजनांचे सर्व नियोजन करुन बाजार समिती सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे पारनेर बाजारसमितीचे सभापती प्रशांत गायकवाड, घोडेगाव बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवे यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
पेरणीसाठी ‘बीबीएफ’ तंत्राचा वापर करा :...औरंगाबाद : ‘‘बीबीएफ टोकण यंत्राचा वापर वेगवेगळी...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंका पीक...जळगाव ः केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
हतनूर धरणाची साठवण क्षमता घटलीभुसावळ, जि. जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख सिंचन...
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा...जालना  : ‘‘शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक...
रिसोड बाजार समितीत हळदीची दोन दिवस खरेदीअकोला ः गेल्या काही वर्षांत वाशीम तसेच अकोला...
खानदेशात सर्वदूर पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात पेरणी ८८ टक्‍क्‍यांवर पोचली असून...
परभणीत २५ हजारांवर शेतकऱ्यांची कापूस...परभणी  : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
रत्नागिरी जिल्ह्यातील भाजीपाला,...रत्नागिरी : कोरोना टाळेबंदीत जिल्ह्यातील महिला...
सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पेरणी वाया...सांगली : जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून...
नगर जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर पेरानगर ः यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्रांमध्ये...
परभणी जिल्ह्यात ७४.४३ टक्के पेरणीपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवार...
अकोला जिल्ह्यात पीक कर्जापासून ५२ टक्के...अकोला ः खरीप हंगामाला सुरुवात झाली असून,...
पाऊस नसल्याने संरक्षित पाण्यावर भातलागवडनाशिक : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी...
बियाणे भरपाई दिलेल्या शेतकऱ्यांची नावे...नागपूर ः आपल्या सत्ताकाळात निकृष्ट बीटी...
जळगाव, धुळ्यात युरियाची टंचाई कायमधुळे ः जळगाव व धुळे जिल्ह्यांत युरियासह १०.२६.२६...
महाजॉब्स संकेतस्थळाच्या माध्यमातून...मुंबई : देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो की...
केंद्राकडून शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय...कऱ्हाड, जि. सातारा ः अर्थव्यवस्थेला शेतकरी राजा...
करमाळ्यातील आदिनाथ कारखाना...करमाळा, जि. सोलापूर : करमाळा तालुक्‍यातील आदिनाथ...
हॉटेल्स, लॉज उद्यापासून सुरू होणारमुंबई : तब्बल साडेतीन महिन्यांनंतर ८ जुलैपासून...
जनहितचे धरणे अन् तत्काळ शेतकऱ्यांच्या...सोलापूर  ः मोहोळ तालुक्यातील ऑक्टोबर -...