Farming agricultural Business onion auction stops Nashik Maharashtra | Agrowon

लासलगाव, विंचूर, निफाड वगळता जिल्ह्यात बहुतांश कांदा लिलाव बंद

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 एप्रिल 2020

राज्य सरकारच्या आग्रहास्तव बाजार समिती सुरू होती. मात्र जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण वाढल्याने भीती असल्याने मजुरटंचाई आहे. त्यामुळे पुढील आदेश व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत हा निर्णय घेतला. मात्र माणूस जगविणे ही सर्वांची जबाबदारी असल्याने जड अंत कारणाने निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरच पर्याय शोधून कामकाज सूर होईल. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता उन्हाळ कांद्याला टिकवण क्षमता असल्याने तो साठून ठेवावा.
- आमदार दिलीप बनकर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत 

नाशिक  : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या खबरदारी पोटी लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय काही बाजार समित्यांनी घेतला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मात्र, लासलगाव बाजार समितीचे कामकाज सोमवारी (ता.१३) मुख्य बाजार आवर, विंचूर व निफाड उपबाजारात कामकाज सुरू राहणार आहेत. 

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये प्रामुख्याने लाल कांद्याची आवक अंतिम टप्प्यात असून उन्हाळ कांदा आवक सुरू झाली आहे. अशातच कोरोना संसर्गामुळे खबरदारी म्हणून बाजार समित्या पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समिती सुरू असल्याने उमराणे, चांदवड, मालेगाव या बाजार समित्या बंद असल्याने येथील आवक वाढली. अशातच मजूर टंचाई, वाढलेली गर्दी यामुळे नियोजन कोलमडल्याने बाजार समितीने कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. 

उमराणे बाजारात मालेगाव येथून मोठ्या प्रमाणावर मजूर येतात. अलीकडे मालेगाव येथे रुग्ण आढळल्याने येथील ग्रामपंचायतीने गर्दी टाळण्यासाठी कामकाजावर हरकत घेतली आहे. तर व्यापाऱ्यांनी असमर्थता दाखवल्याने कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ग्रामस्थ, ग्रामपंचायत, व्यापारी असोसिएशन यांची तहसीलदार पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत आज(ता.११) कामकाज सुरू ठेवण्याच्या संदर्भात बैठक होणार आहे.

नामपूर बाजार समितीत परिसरातून येणाऱ्या मजुरांना संबंधित गावांमधून मज्जाव होत असल्याने मजूर टंचाई आहे, त्यात व्यापाऱ्यांची असमर्थता असल्याने पुढील निर्णय होईपर्यंत लिलाव बंद राहणार आहेत.

या बाजार समित्या बंद
पिंपळगाव बसवंत, चांदवड, उमराणे, नामपूर, सटाणा, मनमाड, माळेगाव, कळवण

अनिश्‍चित बाजार समित्या
येवला, देवळा

प्रतिक्रिया 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी गुरुवार व शुक्रवार २०० वाहनांची मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात परिस्थितीचा अंदाज घेऊन कांदा लिलाव सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
- भास्कर तांबे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, सटाणा 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कांद्याची आवक नियंत्रित करून खबरदारी घेत कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यामध्ये मोबाइलद्वारे पूर्वनोंदणी करून बाजार समितीचे मनुष्यबळ व क्षेत्र विचारात घेता कामकाज करावे. कांदा हा अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असल्याने अशा परिस्थितीत त्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन कामकाज करावे.
- गौतम बलसाने, जिल्हा उपनिबंधक, नाशिक


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...