farming agricultural business onion stock limit decrease nashik maharashtra | Agrowon

केंद्राने कांदा साठवणूक मर्यादा ५० टक्क्यांनी घटविली 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

केंद्र सरकार ग्राहक कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून कालबाह्य धोरणे लादून कांदा उत्पादक व संबंधित घटकांचा रोष अंगावर ओढून घेत आहे. कांदा दर नियंत्रित करण्याचा शेवटचा पर्याय निर्यात होता. त्यामुळे आशा ग्राहकांच्या हिताच्या निर्णयात शेतकऱ्यांचे नुकसान होईल. सरकारने यावर सखोल अभ्यास करून निर्णय घ्यावेत.
- नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड नवी दिल्ली. 

नाशिक : गेल्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण मंत्रालयाने कांदा साठवणुकीवर निर्बंध आणले होते. घाऊक व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादा  ५० टन आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठी १० टन करण्यात आली होती. तरीही मागणीच्या तुलनेत देशभर कांद्याचा पुरवठा होत नसल्याने दरात वाढ होऊ लागल्याचे पाहायला मिळाले. या स्थितीत पुन्हा कांदा पुरवठा सुरळीत करण्यासाठी पर्याय म्हणून घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांवर साठवणुकीचे निर्बंध आणत घाऊक व्यापाऱ्यांसाठी २५ टन तर किरकोळ व्यापाऱ्यांसाठी ५ टन साठवण मर्यादा घालून दिली आहे. केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्यांची साठवणूक मर्यादा ५० टक्क्यांनी पुन्हा घटविली आहे. 

केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ आर्थिक सल्लागार रोहितकुमार परमार यांच्या स्वाक्षरीसह मंगळवार (ता.३) हा आदेश जारी करण्यात आला आहे. या पत्रात देशातील सर्व व केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा आदेश लागू करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. केंद्राच्या ग्राहक व अन्नपुरवठा विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या कांद्याची साठवणूक शेतकऱ्यांकडे नसून, व्यापाऱ्यांकडे असल्याने हा साठा खुला करण्यात येणार आहे. कांद्याच्या वाढलेल्या दराचा फायदा शेतकऱ्यांना होत नसून, तो मध्यस्थ आणि व्यापारी अधिक घेत आहेत. त्यामुळे कांद्याची साठवणूक मर्यादा घटवल्याचे  बोलले जात आहे. 

कांद्याची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्न 
खुल्या बाजारात कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आयात केलेल्या कांद्यासाठी ही मर्यादा लागू असणार नाही, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी ट्वीट केले आहे. यापूर्वी किरकोळ विक्रेत्यांना १० तर घाऊक विक्रेत्यांना ५० टन कांदा साठवण्याची परवानगी होती. मात्र, ही मर्यादा पुन्हा ५० टक्क्यांनी घटविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांकडील उन्हाळ कांदा संपला, आता नुकसान झाल्यानंतर थोडा फार लाल कांदा बाजारात येत असून बाजारभाव मिळत आहेत. त्यात सरकार यात हस्तक्षेप करून शेतकऱ्यांचे नुकसान करत आहे. सरकारने असे निर्णय घेऊन कांदा उत्पादकांना अडचणीत आणू नये, असे कळवण येथील कांदा उत्पादक  विजय पगार यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...