Farming agricultural Business Only fifty lakh liters milk needs subsidy Nagar Maharashtra | Agrowon

राज्यातील ५० लाख लिटर दुधालाच अनुदानाची गरज : गुलाबराव डेरे

सुर्यकांत नेटके
गुरुवार, 30 जुलै 2020

नगर ः केवळ पावडर तयार करण्यासाठी लागणाऱ्या ४५ ते ५० लाख लिटर दुधालाच अनुदान देणे गरजेचे आहे, असे मत कल्याणकारी दूध उत्पादक संघाचे नेते गुलाबराव डेरे यांनी मांडले.

नगर ः राज्यात गाईच्या संकलित होणाऱ्या १ कोटी ३० लाख लिटर दुधापैकी ६० लाख लीटर पिशवीबंद दुधाची दूध संघ विक्री करतात, तर दहा लाख लिटर दुधाचे उपपदार्थ विकतात. हे दर कायम आहेत. परंतु दूध पावडरचे दर पडले म्हणून दूध संघ सरसकट दुधाला कमी दर देत आहेत. मुळात पिशवीबंद दुधाची ४५ ते ५० रुपयांनी विक्री होत असताना संघांना शेतकऱ्यांना ३० रुपये दर देणे अवघड नाही. त्यामुळे दुधाला सरसकट अनुदान मागणे चुकीचे आहे. केवळ पावडर तयार करण्यासाठी लागणाऱ्या ४५ ते ५० लाख लीटर दुधालाच अनुदान देणे गरजेचे आहे, असे मत कल्याणकारी दूध उत्पादक संघाचे नेते गुलाबराव डेरे यांनी मांडले.  

गाईच्या दुधाला दर नसल्याच्या कारणाने आंदोलन पेटू लागले आहे. बहुतांश नेत्यांनी दुधाला प्रतिलिटर अनुदान देण्याची मागणी केली आहे. मात्र राज्यात संकलित होणाऱ्या दुधाला सरसकट अनुदान मागणे चुकीचे आहे, असा मत श्री. डेरे यांनी मांडले. श्री. डेरे दुधप्रश्‍न आणि उपाययोजनेबाबत सविस्तर माहिती सरकारकडे मांडणार आहेत.
श्री. डेरे म्हणाले की, कोरोना व्हायरसमुळे दुधाला मागणी नसल्याचे सांगितले जात असले तरी शहरातील दुधाची विक्री आणि दर कमी झालेले नाहीत. गाईच्या संकलित होणाऱ्या एक कोटी तीस लाख लीटर दुधापैकी आजही साठ ते ६२ लाख लीटर दूध ग्राहकांना पिशवीतून विकले जात असून त्याचा दर ४५ ते ५० रुपये लीटर आहे. दहा लाख लिटर दुधाचे उपपदार्थ तयार केले जात असून त्याचेही दर पूर्वीप्रमाणे कायम आहेत. 

‘‘दूध पावडरचे दर पडलेले आहेत असे सांगून सगळ्याच दुधाला कमी दर देत आहेत. मुळात हीच शासन आणि दूध उत्पादकांची फसवणूक आहे. जर ४५ ते ५० रुपयांनी संघ टोण्ड दूध विकत असतील तर शेतकऱ्यांना ३० रुपये दर देणे अवघड नाही. त्यामुळे दुधाला सरसकट अनुदान मागणे चुकीचे आहे. केवळ पावडर तयार करण्यासाठी लागणाऱ्या ४५ ते ५० लाख लीटर दुधालाच अनुदान देणे गरजेचे आहे. सरसकट अनुदान म्हणजेच शेतकऱ्यांचा नव्हे दूध संघाचाच फायदा आहे,’’ असे श्री. डेरे म्हणाले.
 
रोज लागतील तेरा कोटी 

गाईच्या दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदानाची मागणी केली जात आहे. अनुदान द्यायचे झाल्यास दररोज किमान तेरा कोटी रुपये लागणार आहेत. महिन्याला केवळ अनुदानावर चारशे कोटी रुपये खर्च करावे लागतील. दोन वर्षांपूर्वी असेच अनुदान जाहीर झाले होते. तीन महिने सुद्धा योजना टिकली नाही. अजूनही कित्येक शेतकऱ्यांचे अनुदान मिळालेले नाही. तशीच अवस्था आताही होऊ शकते, असेही श्री. डेरे म्हणाले. 

प्रतिक्रिया
दुधाचे दर पडले आणि चारा, पशुखाद्याचे दर वाढले. त्यामुळे दुधाला तीस रुपये दर मिळाला तरच व्यवसाय टिकेल अशी अवस्था आहे. त्यामुळे दीर्घकाळ टिकणारे उपाय करणे गरजेचे आहे. नाही तर महिना-दोन महिन्यात पुन्हा मागचेच दिवस येतील. 
- गुलाबराव डेरे, अध्यक्ष, कल्याणकारी दुध उत्पादक संघ, नगर


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...