Farming agricultural Business orders to Supply of agricultural commodities to wholesalers should be continue Mumbai Maharashtra | Agrowon

मुंबईतील घाऊक व्यापाऱ्यांना शेतमालाचा पुरवठा सुरू ठेवा : बाजारसमितीची व्यापाऱ्यांना सूचना

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 एप्रिल 2020

मुंबई  : मुंबई आणि परिसरात कोरोनाचा वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे भाजीपाला, फळ आणि कांदा-बटाटा बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, गेले काही दिवस बाजार आवारातील गर्दीचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी अर्ध्याहून अधिक भाजीपाला वाहने थेट मुंबईत सोडली जात आहेत. तसेच बाजार समितीतील व्यापारी आणि अडत्यांनी शेतकऱ्यांकडील शेतमालाचा थेट पुरवठा घाऊक व्यापाऱ्यांना सुरू ठेवून मुंबई आणि परिसरात शेतीमालाचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही त्यांना केल्याचे मुंबई बाजार समितीचे प्रशासक तथा सचिव अनिल चव्हाण यांनी सांगितले. 

मुंबई  : मुंबई आणि परिसरात कोरोनाचा वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे भाजीपाला, फळ आणि कांदा-बटाटा बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, गेले काही दिवस बाजार आवारातील गर्दीचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी अर्ध्याहून अधिक भाजीपाला वाहने थेट मुंबईत सोडली जात आहेत. तसेच बाजार समितीतील व्यापारी आणि अडत्यांनी शेतकऱ्यांकडील शेतमालाचा थेट पुरवठा घाऊक व्यापाऱ्यांना सुरू ठेवून मुंबई आणि परिसरात शेतीमालाचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही त्यांना केल्याचे मुंबई बाजार समितीचे प्रशासक तथा सचिव अनिल चव्हाण यांनी सांगितले. 

कोरोनाच्या प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर असला तरी मुंबई आणि परिसरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा-बटाटा, भाजीपाला, फळे, मसाला मार्केट आणि धान्य बाजार सुरू ठेवले होते. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी समिती प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या होत्या. मात्र, मुंबई आणि परिसरात कोरोनाचा वाढत्या प्रसारामुळे बाजार आवारातील घटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. व्यापारी संघटनांच्या विनंतीनुसार शनिवारपासून (ता.११) मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला, फळ आणि कांदा बटाटा बाजार बंद करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. 

बाजार समितीत दैनंदिन कामकाजासाठी व्यापारी, अडते, माथाडी, मजूर, खरेदीदार आदी विविध घटकांचे सुमारे २५ ते ३५ हजार प्रतिनिधी एकत्र येतात. समिती प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात, हे खरे असले तरी इतक्या मोठ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही.

बाजार आवारात कोरोना विषाणूच्या सामूहिक संसर्गाची शक्यता व्यक्त केल्यामुळे व्यापारी, अडते, माथाडी आदी घटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, दैनंदिन कामासाठी मजूर येत नाहीत. शेतीमाल उतरून घेण्यासही माणसं उपलब्ध होत नाहीत, अशी माहिती व्यापारी वर्गातून देण्यात आली. त्याचमुळे घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ, फ्रंट ऑफ युनायटेड फ्रूट्स असोसिएशन, कांदा-बटाटा अडत व्यापारी संघ व्यापारी संघटनांकडून बाजार आवार बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली होती, असेही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
 
आठवडाभर बंद
दुसरीकडे दिवसागणिक मुंबई व परिसरात वाढत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता शासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उद्या (आज)पासून एक आठवडाभर मुंबई व नवी मुंबई परिसरातील भाजीपाला मार्केट एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वस्त्रोद्योग, मत्स्यसंवर्धन व बंदरविकास आणि मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...