Farming agricultural Business packaged onion auction starts Nashik Maharahtra | Agrowon

लासलगाव येथे गोणी पद्धतीनुसार कांदा लिलाव सुरु

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये, शेतकऱ्यांना कांदा विक्री करता यावी तसेच कांदा गोण्या शिवणाऱ्या महिलांना रोजगार मिळावा यासाठी आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला अडचणी होत्या मात्र हे काम सुरळीत झाले असून गोणीतून आणलेल्या कांद्याला चांगला दर मिळत आहे. 
- सुवर्णा जगताप, सभापती, बाजारसमिती, लासलगाव, जि. नाशिक.
 

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने कमी गर्दीत लिलावाचे कामकाज सुलभ व्हावे यासाठी शुक्रवारपासून (ता.२७) लासलगाव बाजार समितीतील कांदा बाजार आवारातील कांदयाचे लिलाव गोणी पद्धतीनुसार सुरू झाले आहेत. 

कांदा लिलाव सुरू करण्याबाबत गुरुवारी (ता.२६) बाजार समितीत निफाडचे तहसीलदार दिपक पाटील, सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) अभिजित देशपांडे, बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांची व्यापाऱ्यांसमवेत बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी शेतकऱ्यांनी कांदा फक्त नवीन ज्यूटच्या बारदान गोणीत ४५ ते ५० किलो समप्रमाणात भरुन प्रतवारी करुन विक्रीस आणावा असे सांगण्यात आले. संचारबंदी व जमावबंदी आदेश असल्याने कांदा गोणी शिवणाऱ्या सुमारे ३००० महिला कामगार बेरोजगार झाल्या होत्या. त्यांना आता घरीच हे काम मिळण्याची आशा आहे. लासलगाव बाजार समितीत शुक्रवारपासून (ता.२७) पुढील सूचना मिळेपर्यंत खुल्या स्वरूपात कांद्याचे लिलाव होणार नाहीत, असे यावेळी जाहिर करण्यात आले आहे.

कांदा गोणीतील संपुर्ण माल एकसारखा राहिल याबाबत निकष देण्यात आले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी शुक्रवारी बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणला होता. परंतु, काही शेतकऱ्यांनी घरी गोण्या उपलब्ध नसल्याने तो बाजारसमिती आवारासमोर गोण्या विकत घेऊन कांदा त्यात भरला. यामुळे सकाळी काही काळ गोंधळाचे वातावरण होते. यावेळी सुमारे १८०० कांदा गोण्यांची आवक झाल्याची माहिती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. या पध्दतीमुळे खुल्या कांद्याच्या तुलनेत दरात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले.

उपबाजारांत खुल्या पद्धतीने लिलाव 
लासलगाव येथे मजुरटंचाई असल्याने कांदा गोणीत भरून आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजार समितीच्या विंचूर व निफाड उपबाजार आवारात मनुष्यबळ उपलब्ध असल्याने येथे खुल्या पद्धतीने लिलाव होणार असल्याचे सभापती जगताप यांनी सांगितले. 
 

२३ मार्चची दर स्थिती (रुपये, क्विंटल) : 
कांदा किमान कमाल सर्वसाधारण दर
लाल ५०० १५२६ १३५१
उन्हाळ १००० १४७८ १३६०

 

२७ मार्चला असलेले दर
कांदा किमान कमाल सर्वसाधारण दर
लाल ६६० १६४० १५११
उन्हाळ ७०० १६८० १६००

 


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...
खावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...
मुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...
कृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्वसिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या...
इथेनॉलकडे साखर वळविणारकोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा...
मराठवाडा, विदर्भात उद्या पावसाचा अंदाज पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे....
अभूतपूर्व साखर साठ्याचे संकट पुणे: राज्यात ७२ लाख टन साखर शिल्लक असताना येत्या...
श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीप्रमाणे...पुणे ः आठवडे बाजारात थेट विक्रीच्या माध्यमातून...
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...