गडचिरोली जिल्ह्यात ७२ हजार क्‍विंटल धान खरेदी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

गडचिरोली  ः आदिवासी विकास कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यात हमीभावाने धानाची खरेदी करण्यात येत आहे. याकरिता सुमारे ४७ केंद्रे सुरू करण्यात आली असून, त्या माध्यमातून आजवर सुमारे ७२ हजार क्‍विंटल धानाची खरेदी झाली आहे. 

गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गंत आरमोरी, कुरखेडा, धानोरा, कोरची, घोट येथे कार्यालये असून, या सर्व कार्यालयांच्या हद्दीतील गावांमध्ये खरीप हंगामात धानाची खरेदी केली जाते. रब्बी हंगामातही धानाचे उत्पादन घेतले जात असल्यने महामंडळाच्या वतीने २० ते २५ खरेदी केंद्रे नियमित सुरू ठेवली जातात. एकूणच जिल्ह्यात महामंडळ व आदिवासी विकास संस्थांच्या वतीने धान खरेदीचा व्यवहार मोठ्या प्रमाणात केला जातो. महामंडळाच्या केंद्रावर साधारण प्रतीच्या धानाच्या खरेदी केली जाते.

मात्र, राज्य शासनाने गतवर्षीच्या हंगामापासून प्रती क्‍विंटल ५०० रुपये बोनस संबंधित शेतकऱ्याला जाहीर केला आहे. गतवर्षीच्या हंगामात धानाची विक्री केलेल्या हजारो शेतकऱ्यांना प्रती क्‍विंटल ५०० रुपये प्रमाणे बोनसची रक्‍कम अदा करण्यात आली. महाविकास आघाडीच्या सरकारने सुध्दा ५०० रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकरी खासगी व्यापाऱ्यांऐवजी आदिवासी विकास संस्थांच्या केंद्रांवर धानाची विक्री करीत आहेत.

गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील सर्व केंद्रांवर मिळून शुक्रवारपर्यंत (ता. १३) पर्यंत ६८ हजार क्‍विंटल धानाची खरेदी झाली होती. त्यानंतर ही खरेदी सुमारे ७२ हजार क्‍विंटलवर पोचली आहे. महामंडळाकडून धान खरेदीचे चुकारे करण्याची प्रक्रियादेखील हाती घेण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com