श्री पांडुरंग कारखाना उसाला देणार प्रतिटन २६०१ रुपये

चालू गळीत हंगामात कारखाना ७३०० टनाने दैनंदिन गाळप करत आहे. कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पातून आजपर्यंत १ कोटी ४१ लाख ६६ हजार युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. - सुधाकर परिचारक, अध्यक्ष, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  ः श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना यंदा उसाला प्रतिटन २ हजार ६०१ रुपये दर देणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी दिली. पांडुरंग कारखान्याने जाहीर केलेला हा ऊसदर जिल्ह्यात सर्वाधिक आहे. कारखान्याच्या एफआरपीपेक्षा ९६ रुपयांनी जास्त आहे, असेही त्यांनी सांगितले.

परिचारक म्हणाले, ‘‘ऊसदराचा पहिला हप्ता २१०० रुपये देण्यात येईल. उर्वरित रक्कम बैलपोळा व दिवाळी सणावेळी देण्यात येईल. यंदा कारखान्याने मंगळवारपर्यंत (ता. ३१) २ लाख ८९५ टन उसाचे गाळप करून ९.८४ टक्के सरासरी साखर उताऱ्याने १ लाख ९३ हजार ८०० साखर पोती उत्पादित केली. या हंगामात पाण्याच्या कमतरतेमुळे उस उपलब्धता कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात सर्वच कारखान्याचे गाळप कमी होणार आहे. तरीदेखील विश्वासार्हतेच्या जोरावर पांडुरंग कारखाना आपले उद्दिष्ट पूर्ण करेल``.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com