मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
बातम्या
तीन जिल्ह्यांत मुगाचे दोन कोटी ४० लाख रुपयांचे चुकारे थकीत
नांदेड ः किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत शुक्रवारपर्यंत (ता. १३) नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ७३५ शेतकऱ्यांचा ३ हजार ६३२.५९ क्विंटल मूग खरेदी करण्यात आला. आजवर केवळ परभणी जिल्ह्यातील ४१ शेतकऱ्यांच्या २२३ क्विंटल मुगाचे १५ लाख ७२ हजार १५० रुपयांचे चुकारे वितरित करण्यात आले आहेत. अजून तीन जिल्ह्यांतील एकूण ६९४ शेतकऱ्यांचे २ कोटी ४० लाख ३७ हजार ३९८ रुपयांचे चुकारे थकीत आहेत. पुढील आठवड्यात शेतकऱ्यांना थकीत चुकारे मिळतील, असे संबंधित सूत्रांनी सांगितले.

यंदा मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी अनेक वेळा मुदतवाढ देऊनही नोंदणीकरिता शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. शुक्रवारपर्यंत (ता. १३) या तीन जिल्ह्यांतील ६१५० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यामध्ये मुगासाठी ३ हजार ४३, उडदासाठी ३९५, सोयाबीनसाठी २७१२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नांदेड जिल्ह्यात जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयांतर्गत नाफेडच्या नांदेड (अर्धापूर), मुखेड, हदगाव, किनवट या केंद्रांवर मिळून एकूण ४३६ शेतकऱ्यांनी आणि विदर्भ को. मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर ४२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. फक्त मुखेड केंद्रावर २९ शेतकऱ्यांचा १२५ क्विंटल मूग खरेदी करण्यात आला. उडीद, सोयाबीनची खरेदी झालेली नाही.
परभणी जिल्ह्यातील नाफेडच्या परभणी, जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा येथील केंद्रांवर मूग, उडीद, सोयाबीनसाठी एकूण १४४० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. एकूण ३०३ शेतकऱ्यांची १६२०.५९ क्विंटल मूग खरेदी करण्यात आला. विदर्भ को मार्केटिंग फेडरेशनच्या मानवत आणि गंगाखेड येथील केंद्रांवर मूग आणि सोयाबीनसाठी एकूण १३७८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ५६० शेतकऱ्यांचा ३१०७.५९ क्विंटल मूग खरेदी करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातील नाफेडच्या हिंगोली कळमनुरी, वसमत, जवळा बाजार, सेनगाव येथील केंद्रांवर मूग, उडीद, सोयाबीनसाठी एकूण २८३७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी हिंगोली येथे १४६ शेतकऱ्यांच्या ३९९.५० क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली.
शुक्रवारपर्यंत या तीन जिल्ह्यांतील ७३५ शेतकऱ्यांच्या ३ हजार ६३२.५९ क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली. हमीभावानुसार (प्रतिक्विंटल ७ हजार ५० रुपये) या मुगाची किंमत २ कोटी ५६ लाख ९ हजार ७५९ रुपये होते. आजवर नाफेडतर्फे परभणी जिल्ह्यातील ४१ शेतकऱ्यांना २२३ क्विंटल मुगाचे १५ लाख ७२ हजार १५० रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. परंतु, या तीन जिल्ह्यांतील ६९४ शेतकऱ्यांचे ३४०९.५६ क्विंटल मुगाचे २ कोटी ४० लाख ३७ हजार ३९८ रुपयांचे चुकारे थकीत आहेत.
जिल्हा | शेतकरी संख्या | मूग खरेदी |
नांदेड | २९ | १२५ |
परभणी | ५६० | ३१०७.५९ |
हिंगोली | १४६ | ३९९.५० |
जिल्हा | मूग | उडीद | सोयाबीन | एकूण |
नांदेड | १७५ | १७ | ३०३ | ४९५ |
परभणी | २०४५ | ८ | ७६५ | २८१८ |
हिंगोली | ८२३ | ३७० | १६४४ | २८३७ |
- 1 of 1504
- ››