Farming agricultural Business raisin production increase Sangli Maharashtra | Agrowon

राज्यात बेदाण्याचे सव्वा दोन लाख टन उत्पादन

अभिजित डाके
रविवार, 31 मे 2020

सांगली : यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर ‘कोरोना’चे अभूतपूर्व संकट आले. ऐन हंगामातच वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीवर भर दिला. राज्यात यंदाच्या हंगामात २ लाख २५ हजार मेट्रिक टन बेदाण्याचे उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्पादन ३० ते ३५ हजार टनांनी उत्पादन वाढले आहे.

सांगली : यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर ‘कोरोना’चे अभूतपूर्व संकट आले. ऐन हंगामातच वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीवर भर दिला. राज्यात यंदाच्या हंगामात २ लाख २५ हजार मेट्रिक टन बेदाण्याचे उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्पादन ३० ते ३५ हजार टनांनी उत्पादन वाढले आहे.

दरवर्षी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आपत्तीला सामोरे जावे लागते. यंदाही नैसर्गिक आपत्तीमधून शेतकरी सुटला नाही. यावर्षी अभूतपूर्व अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी सापडला. त्याअगोदर अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले. त्यातून सावरत शेतकऱ्यांनी बागा जगवल्या. त्यामुळे हंगाम एक ते दीड महिना उशिरा सुरु झाला. दरम्यान, ‘कोरोना’मुळे २२ मार्चपासून बाजारपेठाच बंद झाल्या. जिल्हा, राज्य बंदी झाली. त्यामुळे द्राक्ष विक्री थांबली. द्राक्ष काढणीला आली होती, द्राक्षांची काढणी केली नाही तर मोठे नुकसान होईल, या भीतीने त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीकडे वळले.

यंदाचा बेदाणा हंगाम जानेवारीत सुरु झाला. मार्च महिन्यात नवीन बेदाण्याचे सौदे सुरु झाले. २२ मार्चपर्यंत २० ते २५ हजार टन बेदाण्याची विक्री झाली. दोन महिने सौदे बंद होते. त्यामुळे बेदाणा शीतगृहात तसाच आहे. वास्तविक पाहता, दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात सुमारे ५० ते ६० हजार मेट्रीक टन बेदाण्याची विक्री होते.

परंतु सौदे बंद असल्याने बेदाण्याची विक्री होऊ शकलेली नाही. यंदाच्या हंगामात २ लाख २५ हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले आहे. वास्तविक पाहता, दरवर्षी बेदाणा हंगामाच्या मध्यावर अवकाळी पावसाची पडतो. त्यात बेदाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यंदा अवकाळी पाऊस झाला, पण बेदाण्याचे नुकसान न झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.गेल्यावर्षी बेदाणा निर्मितीसाठी पोषण वातावरण होते, त्यामुळे उत्पादन १ लाख ९० हजार टन झाले होते. अर्थात गेल्या दोन वर्षांत बेदाण्याच्या उत्पादनात ३० ते ३५ हजार मेट्रीक टनाने वाढ होत असल्याचे चित्र आहे.
 
 

राज्यातील बेदाणा उत्पादन
सन उत्पादन (टन)
२०१६-१७ १ लाख ८० हजार
२०१७-१८ १ लाख ६० हजार
२०१८-१९ १ लाख ९० हजार
२०१९-२० २ लाख २५ हजार

 

बेदाणा दृष्टिक्षेप

  •  तासगाव बाजारसमितीतील बेदाण्याचा दर ः ८० ते १७० रुपये प्रति किलो.
  • तासगाव शीतगृहात ः ५५ हजार मेट्रीक टन बेदाणा.
  • सांगली शीतगृहात ः ४५ हजार मेट्रीक टन बेदाणा.

इतर अॅग्रो विशेष
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...
राज्यातील २५ लाख खातेदारांना साडेसोळा...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
दूध भुकटी योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
जिल्हा बँकांना शासकीय व्यवहार करण्यास...मुंबई : शासकीय निधीची सुरक्षितता लक्षात घेऊन...
राज्यात सावकारांकडून दरमहा १०० कोटींचे...सोलापूर : राज्यात मागील पाच वर्षांत तब्बल ७५२...
नियमनमुक्तीला पुणे महापालिकेचा हरताळपुणेः एकीकडे केंद्र आणि राज्य शासन शेतमाल बाजार...
विदर्भात वादळी पावसाचा अंदाजपुणे: कोकण, घाटमाथ्यावर मॉन्सूनचा पाऊस सक्रिय...
मराठवाड्यात सोयाबीनची सरासरीपेक्षा अधिक...औरंगाबाद : खरिपाच्या पेरण्या जवळपास ८३ टक्के...
कृषी व्यापार अध्यादेशामुळे दिलासापुणे: केंद्राने काढलेल्या ‘कृषी उत्पादने व्यापार...
खानदेश, मराठवाडा, वऱ्हाडात पावसाच्या सरीपुणे : मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने कोकणासह...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
‘सरफेसी' कायदा आहे तरी काय? दिवसेंदिवस बॅंकांच्या थकीत रकमेत वाढ दिसून येत...
लष्करी’ हल्लाखरीप हंगामाच्या सुरवातीलाच राज्यात मका पिकावर...
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने गेल्या काही...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा उद्यापासून...औरंगाबाद ः कृषी निविष्ठा  विक्रेत्यांच्या...
सफरचंद झाडाला फळधारणा ! नाशिकच्या...नाशिक : जिल्हा फलोत्पादन व विविध प्रयोगात आघाडीवर...
कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पडणाऱ्या...