Farming agricultural Business Reduction in loan interest rate from District Bank Satara Maharashtra | Agrowon

सातारा जिल्हा बॅंकेकडून कर्ज व्याजदरात कपात

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जून 2020

सातारा  : `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये शेतकरी व ग्राहकांना आधार देण्यासाठी जिल्हा बॅंकेने कर्ज व्याजदरात अर्धा ते दोन टक्‍क्‍यांपर्यंत कपात केली आहे. त्याचा जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना व सवलती देखील लागू केल्या आहेत.

सातारा  : `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये शेतकरी व ग्राहकांना आधार देण्यासाठी जिल्हा बॅंकेने कर्ज व्याजदरात अर्धा ते दोन टक्‍क्‍यांपर्यंत कपात केली आहे. त्याचा जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना व सवलती देखील लागू केल्या आहेत.

बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबतची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर उद्‌भवलेल्या परिस्थितीसंदर्भात संचालक मंडळाची बैठक झाल्याचे सांगून, त्यामधील निर्णयांची माहिती दिली. या वेळी सहकारमंत्री व तज्ज्ञ संचालक बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक अनिल देसाई, दत्तानाना ढमाळ, प्रदीप विधाते, माजी आमदार प्रभाकर घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे उपस्थित होते.

श्री. भोसले म्हणाले, की जिल्ह्यात द्राक्षबाग, कुक्कुटपालन, कृषी पर्यटन व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले आहे. बॅंकेने या व्यवसायाला कर्जपुरवठा केला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी परतफेड केलेल्या वसूलपात्र हप्त्यावरील व्याजाचा परतावा देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यासाठी ५० लाखांची तरतूद केली आहे. पगारदार कर्मचाऱ्यांना ३५ लाखांपर्यंतचा विमा देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून, त्याचा फायदा बॅंकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना होणार आहे.

सोने तारण कर्जपुरवठ्यावरील व्याजदरात १.२५ टक्के कपात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना दहा टक्के दराने सोने तारण कर्ज मिळेल, तसेच प्रती ग्रॅममागे २८ हजार ५०० रुपये कर्ज उपलब्ध होणार आहे. व्याजदर कपातीने सभासदांना दिलासा मिळणार असला, तरी बॅंकेवर अंदाजे बारा कोटींचा बोजा पडणार आहे. बॅंकेच्या अन्य कर्जाच्या योजनांवरही अर्धा ते दोन टक्क्‍यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. त्याचा फायदा सोसायट्यांच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

कर्जमाफी मिळालेले शेतकरी कर्जासाठी पात्र
राज्य सरकारच्या कृषी कर्जमाफी योजनेत सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडील ४२ हजार शेतकरी खातेदार पात्र ठरले असून, त्यांना २२४ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. यापैकी ३५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर १८४ कोटी जमा झाले आहेत. उर्वरित तिसऱ्या यादीतील शेतकरी खातेदारांवर कर्ज नाही, असे गृहित धरून पुढील कर्जासाठी त्यांना पात्र ठरविण्यात आले असल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
शेतकऱ्याने तुटपुंज्या मदतीचा धनादेश...नाशिक : निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी येवला...
अकोला : आवश्‍यक खते मिळवताना...अकोला ः या हंगामातील पिकांची लागवड होऊन बहुतांश...
सिंधुदुर्गात खते मिळाली; पण वेळेत नाहीतसिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात...