Farming agricultural Business registration status of tur procurement Nanded Maharashtra | Agrowon

तीन जिल्ह्यांत तूर विक्रीसाठी २९ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीभावाने (प्रतिक्विंटल ५८०० रुपये) तूर विक्रीसाठी राज्य सहकारी पणन महासंघ आणि विदर्भ सहकारी महासंघाअंतर्गत २३ खरेदी केंद्रांवर शुक्रवार (ता. १४)पर्यंत २९ हजार ६२ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे.

परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत ५६ शेतकऱ्यांची ५५६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी यंदा (२०१९-२०) नाफेडतर्फे राज्य सहकारी पणन महासंघ, विदर्भ सहकारी महासंघ, महाएफपीसी यांच्यामार्फत नोंदणी केली जात आहे.

नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीभावाने (प्रतिक्विंटल ५८०० रुपये) तूर विक्रीसाठी राज्य सहकारी पणन महासंघ आणि विदर्भ सहकारी महासंघाअंतर्गत २३ खरेदी केंद्रांवर शुक्रवार (ता. १४)पर्यंत २९ हजार ६२ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे.

परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत ५६ शेतकऱ्यांची ५५६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी यंदा (२०१९-२०) नाफेडतर्फे राज्य सहकारी पणन महासंघ, विदर्भ सहकारी महासंघ, महाएफपीसी यांच्यामार्फत नोंदणी केली जात आहे.

नांदेड जिल्ह्यात जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयाअंतर्गत नांदेड, हदगाव, किनवट, मुखेड केंद्रांवर शनिवारपर्यं (ता. १५) ७८१९ शेतकऱ्यांनी तर विदर्भ सहकारी महासंघाच्या भोकर, धर्माबाद, नायगाव येथील केंद्रावर १९९५ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली.

राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गत जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयातर्फे परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा या सात केंद्रांवर एकूण ७ ७३९ शेतकऱ्यांनी आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कन्हेरगाव, कळमनुरी, वसमत, जवळाबाजार, सेनगाव, साखरा येथील केंद्रांवर एकूण ९२२९ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. विदर्भ सहकारी महासंघातर्फे परभणी जिल्ह्यातील मानवत आणि गंगाखेड येथील केंद्रांवर २२७५ शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी केली आहे.

हदगाव येथे आजपासून खरेदी
जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयाअंतर्गत हिंगोली येथील केंद्रावर शुक्रवारपर्यंत (ता. १४) २७ शेतकऱ्यांची २९३.९० क्विंटल, कळमनुरी येथील केंद्रावर ४ शेतकऱ्यांची ३३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. विदर्भ सहकारी महासंघाच्या मानवत येथील केंद्रांवर २५ शेतकऱ्यांची २३० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. नांदेड, किनवट, मुखेड येथे केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सोमवारी (ता. १७) हदगाव येथे केंद्र सुरू होईल. नांदेड जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत (ता. १४) तूर खरेदी झाली नव्हती. परभणी, पालम, पूर्णा येथे, हिंगोली जिल्ह्यांत वसमत, सेनगाव या ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, असे सूत्रांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
‘चांगभलं’च्या जयघोषाविना यंदा जोतिबाची...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर ः कोरोना आणि...
नक्षलवाद्यांनीही घेतला कोरोनाचा धसका;...मुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत...
मुंबईत हापूसची आवक वाढली; ५ डझन पेटीस...मुंबई : वाहतुकीतील अडथळे दूर केल्याने मुंबई कृषी...
नांदेड जिल्ह्यात गारपीटीमुळे पिके...नांदेड : जिल्ह्यातील ४० मंडळांमध्ये मंगळवारी (ता....
इचलकरंजीत विक्रेत्यांकडून चाराविक्रीचे...कोल्हापूर : वैरण बाजारात चारा विक्रेत्यांनी...
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी...नांदेड :‘‘‘लॅाकडाऊन’मुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या...
चाकूर तालुक्यात गारपीटीने पिके,...चापोली, जि. लातूर : चाकूर तालुक्यातील धनगरवाडी व...
बंदीवानांनी पिकवला भाजीपालाअकोला ः येथील जिल्हा कारागृहात असलेल्या शेतीत...
नांदेड जिल्ह्यात सहा हजार क्विंटल...नांदेड : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी लॅाकडाऊन...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची पावणे...औरंगाबाद : ‘‘राज्य कापूस पणन महासंघातर्फे...
अकोला पाणी टंचाईच्या उपाययोजना खोळंबल्याअकोला ः एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे ग्रामीण भागात...
अकोला बाजार समितीत गव्हाची टोकन...अकोला ः ‘कोरोना’ विषाणू प्रतिबंधात्मक...
वाडेगावमध्ये शेतकऱ्यांकडून मोफत...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना सहकार्य...
लॉकडाऊनमुळे ओझोनचा थर भरतोय का?सध्या सर्वत्र एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ओझोनचा...
हिंगणघाट तालुक्‍यात सीसीआयकडे थकले...वर्धा ः सीसीआयला कापूस देणाऱ्या हिंगणघाट तालुक्‍...
नेरच्या शेतकऱ्यांची सोन्यासारखी फुले...देऊर, जि. धुळे : जगासह देशात ‘कोरोना’ विषाणूने...
विदर्भात कोरोना बाधितांची संख्या पोचली...नागपूर ः बुलडाणा, अमरावती नंतर नागपुरातील पहिल्या...
पुणे बाजार समितीत ३२५ वाहनांमधून...पुणे : शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या...
इंदापुरातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळपुणे  ः  कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू...
`कोरोना`च्या पार्श्वभूमीवर पुणे...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी...