राजापुरात पावणेदोनशे क्विंटल भात खरेदी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

राजापूर, जि. रत्नागिरी  ः राजापूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या खरेदी केंद्रावर पावणेदोनशेहून अधिक क्विंटल भात खरेदी झाला. या माध्यमातून सव्वातीन लाख रुपयांची उलाढाल झाली.

अवकाळी पाऊस आणि क्यार वादळामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले. या स्थितीत भात खरेदीच्या दरात शासनाने गतवर्षीच्या तुलनेमध्ये वाढ केल्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे. लहरी पाऊस, मनुष्यबळाची कमतरता, मजुरी आणि यांत्रिक साधनांचे वाढते दर आदींमुळे भातशेती तोट्यात असल्याचे बोलले जाते. पावसाळी हंगामामध्ये राबूनही त्या तुलनेमध्ये उत्पन्न मिळत नसल्याने अनेकांनी भातशेतीकडे पाठ फिरविली आहे. त्यातून यापूर्वी हिरवेगार असलेले भातशेतीचे मळे अलीकडे पडीक असल्याचे चित्र दिसत आहे. भातशेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भातशेती थांबवून बाजारपेठेतून तांदूळ खरेदीला प्राधान्य दिले आहे. 

शेतात पिकणारा भात शासनाकडून खरेदी केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना यातून उत्पन्न मिळत आहे. गतवर्षी संघाद्वारे ७२० क्विंटल भात खरेदी झाली. त्यातून सुमारे १६ लाख २० हजार रुपयांची उलाढाल झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा शासनाने ६५ रुपये जास्त दर दिला आहे.  गेल्या वर्षी दर १ हजार ७५० रुपये होता. या वर्षी हा दर १ हजार ८१५ रुपये जाहीर केला आहे. डिजिटल कारभारामुळे भात खरेदी केल्यानंतर खरेदी-विक्री संघाकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा केले जातात. भात खरेदीनंतर सुमारे पंधरा दिवसांमध्ये ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते.

शेतकऱ्यांचे बोनसकडे लक्ष गतवर्षी भात खरेदीचा दर १ हजार ७५० रुपये क्विंटल होता. त्याच वेळी शासनाकडून प्रतिक्विंटल पाचशे रुपये बोनस असा मिळून २ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. या वर्षी शासनाकडून प्रतिक्विंटल १ हजार ८१५ रुपये एवढा दर निश्‍चित केला आहे. मात्र बोनसबाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे या वर्षी गतवर्षीप्रमाणे भात खरेदीला प्रतिक्विंटल बोनस मिळणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com