वसंतदादा कारखान्याकडून सॅनिटायझरची निर्मिती

‘कोरोना’चा प्रसार रोखला जावा, यासाठी नफ्याचा विचार न करता सॅनिटायझर बनवले जात आहे. त्याचे नागरिकांना मोफत वितरण केले जाणार आहे. - विशाल पाटील, अध्यक्ष, वसंतदादा सहकारी साखर कारखाना.
वसंतदादा साखर कारखान्याने सॅनिटायझर्सची निर्मिती केली आहे
वसंतदादा साखर कारखान्याने सॅनिटायझर्सची निर्मिती केली आहे

सांगली  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर्स निर्मितीची परवानगी मिळाल्यानंतर वसंतदादा सहकारी साखर कारखान्याने हॅन्ड सॅनिटायझरची पहिली बॅच तयार केली. ९९ टक्के शुध्द अल्कोहोल असलेले आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार तयार झालेले हे राज्यातील पहिले हॅन्ड सॅनिटायझर आहे. 'आयएमटीम विशाल' या नावाने ते बाजारात आणले आहे.

‘कोरोना’चा प्रसार वाढला असून खबरदारीचा उपाय म्हणून सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे. साखर कारखान्यांत निर्माण होत असलेल्या अल्कोहोलपासून सॅनिटायझर निर्मिती करण्याबाबत प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी तातडीने सॅनिटायझर निर्माण करण्याबाबत निर्णय घेतला. वसंतदादा कारखान्याच्या डिस्टिलरीमध्ये गुरुवारपासून सॅनिटायझर निर्मितीस प्रारंभ झाला. अर्धा लिटर ते पाच लिटरच्या बाटलीमध्ये हे सॅनिटायझर पॅकिंग केले जात आहे. नुकतीच पहिली बॅच बाहेर पडली.

विशालदादा युवा प्रतिष्ठानतर्फे या सॅनिटायझरचे मोफत वितरण केले जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये तसेच नागरिकांना मोफत वितरण करण्यासाठी प्रतिष्ठानने यंत्रणा उभारली आहे. वसंतदादा कारखान्यामार्फत दररोज पाचशे बाटल्या उत्पादन झाल्यानंतर त्याचे जिल्हाभर वितरण केले जाणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com