राज्यात साडेसहा लाख क्विंटल फळे, भाजीपाल्याची थेट विक्री

पुणे ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागांतील बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतकरी गटांकडील फळे, भाजीपाल्याला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. कृषी विभागामार्फत सुरू केलेल्या थेट विक्री उपक्रमामध्ये आत्तापर्यंत सहभागी झालेल्या ३७९० शेतकरी, शेतकरी गट व कंपन्यांनी सव्वा महिन्यांत सुमारे सहा लाख ५८ हजार २८७ क्विंटल फळे, भाजीपाल्याची विक्री केली आहे. सध्या यामध्ये आणखी वाढ होताना दिसून येत असल्याची माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
संग्रहित छायाचित्र

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे किराणा माल व भाजीपाला खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याने मार्केट बंद ठेवण्यात येत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना भाजीपाला व फळे विक्रीसाठी अडचणी येत आहे. त्यातच शेतकऱ्यांनी शेतीमाल वाहतूक आणि विक्रीसाठी परवाने घेतले असूनही काही ठिकाणी पोलिसांकडून त्यांची अडवणूक केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी देखील अडचणी येत आहेत.

राज्यातील अनेक ठिकाणी किरकोळ विक्रेते चढ्या दराने भाजीपाला विकत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत आहेत. यापार्श्वभूमीवर नागरिकांना त्यांच्या सोसायटयांमध्येच रास्त दरात ताजा भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार कृषी विभाग व आत्मा यांच्या समन्वयातून शेतकरी गट व शेतकरी कंपन्या यांच्याशी संपर्क साधून शहरात भाजीपाला पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी शेतकरी गट, कंपन्यांकडून पुरवठा होऊ शकणारा भाजीपाला, फळभाज्या आणि फळे यांच्या दराची माहिती असणारे फॉर्म भरून घेतले आहेत. बहुतांशी शेतकरी व गट २७ मार्चपासून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली थेट विक्री करत आहे.  

विभागानिहाय शेतकरी गट, कंपन्यांनी विक्री केलेला शेतीमाल (क्विंटल)
विभाग शेतकरी गट, कंपनी शेतीमाल
ठाणे ३४२ २९,२५२
कोल्हापूर ६२० १,१६,०२६
नाशिक ६४३ १,०७,२४७
पुणे ५५८ १,३३,२०७
औरंगाबाद ६९८ २५,५६३
लातूर ४१५ ५४,४४१
अमरावती २८२ १,४०,०६८
नागपूर २३२ ५२,९३९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com