Farming agricultural Business sugar industry expect to start export to Indonesia kolhapur maharashtra | Agrowon

साखर उद्योगाच्या इंडोनेशियाकडून अपेक्षा वाढल्या 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 जानेवारी 2020

इंडोनेशियाची पामतेलाबाबतची मागणी भारताने मान्य केली आहे. आमची तयार होणारी साखर त्यांनी घ्यावी, यासाठी त्यांना प्रवृत्त करण्याचे काम केंद्राला करावे लागणार आहे. राष्ट्रीय साखर महासंघाच्या वतीने आम्ही वाणिज्य मंत्रालयाकडे आम्ही प्रयत्न करीत आहोत. लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्‍यता आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर वाढत आहेत. या वातावरणात हाही निर्णय झाल्यास साखर उद्योगास संकटाच्या बाहेर पडण्यास मदत होईल. 
- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय साखर महासंघ.

कोल्हापूर : निर्यातीसाठी महत्त्वाचा देश असणाऱ्या इंडोनेशियाकडून साखर उद्योगाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. इंडोनेशियाकडून भारतात आयात होणाऱ्या पामतेलाच्या आयात शुल्कात भारताने पाच टक्के कपात केली आहे. या बदल्यात इंडोनेशियानेही साखरेचे आयात शुल्क कमी करून सकारात्मक पावले उचलली आहेत. मात्र अद्यापही साखरेची मागणी नोंदविली नसल्याने यासाठी भारतीय वाणिज्य मंत्रालयाने प्रयत्न करावेत अशी मागणी साखर उद्योगाकडून होत आहे. 

इंडोनेशिया व मलेशिया हे महत्त्वाचे साखर आयातदार देश आहेत. इंडोनेशियाला प्रतिवर्षी सुमारे ४५ ते ५० लाख टन साखरेचे गरज असते. इंडोनेशियाने यापूर्वी ऑस्ट्रेलिया व ब्राझीलच्या साखरेला पसंती दिली होती. ऑॅस्ट्रेलिया व ब्राझीलच्या साखरेसाठी भारतीय साखरेच्या तुलनेत आयात शुल्क कमी लावल्याने या देशांतून इंडोनेशियाला साखर आयात होत होती. हे पाहून भारतातील साखर उद्योगाच्या एका शिष्टमंडळाने गेल्या वर्षी या देशाचा दौरा करून तुम्ही आयात शुल्क कमी करा, आम्ही तुम्हाला साखर देतो, असे सांगितले. या बदल्यात इंडोनेशियाने भारताने पामतेलावरचे आयात शुल्क कमी करावे, भारताने पामतेल घ्यावे व आम्ही साखर घेतो असा प्रस्ताव मांडला. तो भारताच्या वतीने मान्यही झाला. इंडोनेशियानेही ऑॅस्ट्रेलिया व ब्राझीलइतकेच आयात शुल्क केले आहे.

इंडोनेशियाला १२०० इकुम्साची साखर लागते. भारत मात्र ४०० ते ८०० इकुम्सापर्यंत साखर तयार करू शकतो. यामुळे इंडोनेशियाने अद्यापही साखरेची मागणी नोंदवलेली नाही. भारताने मात्र निर्यात शुल्क कमी करून पामतेल इंडोनेशियाकडून घेण्यासाठी पावले उचलली आहेत. अद्याप शासकीय पातळीवरून इंडोनेशियाकडे साखर खरेदीसाठी पाठपुरावा करण्याचे प्रयत्न झालेले नाहीत. भारतातील हंगाम दोन ते तीन महिन्यांत संपणार असला, तरी आताच निर्णय होणे गरजेचे आहे. असे झाल्यास किमान पुढील वर्षी तरी इंडोनेशियाकडून कच्च्या साखरेचे निर्यातीचे करार केले जातील, अशी आशा साखर उद्योगाला आहे. या निर्णयासाठी राष्ट्रीय साखर महासंघाच्या वतीने पाठपुरावा सुरू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 
 


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...