साखर उत्पादन ६३ टक्क्यांनी घटले

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर  : राज्यातील ऊस तोडीची कूर्मगती डिसेंबरअखेरदेखील सुरूच राहिली. डिसेंबरअखेर राज्यात १६.५० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन तब्बल ६३ टक्क्यांनी घटले आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत ४४ लाख टन साखर उत्पादन झाले होते. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत डिसेंबरअखेर साखर उतारा अर्धा टक्क्यांनी कमीच आहे.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, ऊस हंगाम सुरू होऊन अद्याप महिनाही झाला नाही तोच नगर व औरंगाबाद जिल्ह्यात दोन कारखाने उसाअभावी बंद पडले आहेत. उपलब्ध ऊस पाहता आणखी दोन महिने कसातरी हंगाम चालेल अशी शक्यता व्यक्त होत आहे. सध्या राज्यात १३७ साखर कारखाने सुरू आहेत. 

गेल्या एक महिन्यापासून हंगाम सुरू झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पूरबाधित ऊस हा उतारा घटण्याचे कारण ठरला आहे. राज्यात थंडीचे प्रमाण वाढले असले तरी अपवाद वगळता पश्चिम महाराष्ट्रात थंडी कमी होती. या भागात सरासरी २५ अंश सेल्सिअस दरम्यान तापमान होते. यामुळे उतारा वाढीत फारसा फरक पडला नाही. यामुळे डिसेंबरअखेर उताऱ्यात फारशी वाढ झाली नाही. या भागातील कारखान्यांनी पुरबधित उसतोडीला प्राधान्य दिले आहे. 

सध्या पूरबधित भागातील उसाची ५० टक्के तोडणी पूर्ण झाली आहे. पूर येऊनही ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थापन चांगले केले आहे. अशा ठिकाणच्या उसाचे उत्पादन काही अंशी वाढल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्याच्या इतर भागात थंडीचे प्रमाण चांगले असले तरी कमी पावसाने उसाची योग्य वाढ न झाल्याने याचा फायदा उतारा वाढण्यासाठी झाला नसल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.   देशभरातही साखर उत्पादनात घट कायम ‘इस्मा’ने दिलेल्या माहितीनुसार देशातही साखर उत्पादनात घट कायम आहे. डिसेंबरअखेर देशातील ४३७ साखर कारखान्यांनी ७७ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन १११ लाख मेट्रिक टन होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन ३३ लाख टनांनी कमी आहे. ३३ लाख टन साखर उत्पादन घेऊन उत्तर प्रदेशची घोडदौड सुरू आहे. महाराष्ट्र्र व  कर्नाटकात ऊस आणि साखरेचे उत्पादन घटल्याने साहजिकच देशातील एकूण साखर उत्पादनही घटत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com