farming agricultural business sugarcane rate issue continue satara maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडणार कोण?

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 डिसेंबर 2019

सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली शेतातील ऊसही चरख्यात गेला. गाळप हंगाम सुरू होऊन १५ दिवस उलटून गेले मात्र, तरीही अद्याप कोणत्याही कारखान्याने उसाचा पहिला हप्ता जाहीर केलेला नाही. ऊसदराची कोंडी अजूनही कोणत्याच कारखान्याने फोडली नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.    

सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली शेतातील ऊसही चरख्यात गेला. गाळप हंगाम सुरू होऊन १५ दिवस उलटून गेले मात्र, तरीही अद्याप कोणत्याही कारखान्याने उसाचा पहिला हप्ता जाहीर केलेला नाही. ऊसदराची कोंडी अजूनही कोणत्याच कारखान्याने फोडली नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.    
मॉन्सूनोत्तर पावसामुळे ऊस गाळप हंगाम सुरू होण्यास तब्बल एक महिना उशीर झाला आहे. परिणामी अनेक कारखान्यांची तोडणी यंत्रणा विस्कळित झाली असून ऊस तोड मजूर येण्यास उशिरा झाला. जसजसे ऊस तोडणी मजूर येतील तसा गाळपास वेग येऊ लागला आहे.  मात्र, अद्यापही गाळप अपेक्षित प्रमाणात झालेले नाही. गाळपाची गती वाढविण्यासाठी कारखान्यांकडून सुरुवातीपासून हार्वेस्टरचा वापर केला जात आहे. सध्या अनेक कारखान्यांचे गाळप सुरू होऊन १५ पेक्षा अधिक दिवस होऊन गेले असले तरी पहिला हप्ता किती, कधी देणार याबाबत मौन पाळले गेले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत प्रतिटनास एफआरपी अधिक २०० रुपये तर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी प्रतिटनास चार हजार रुपये दर देण्याची मागणी केली आहे. महापुरामुळे कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस पिकास सर्वाधिक फटका बसला आहे. यामुळे शेतकरी अगोदर हवालदिल झाले असतानाही ऊस दराबाबत साखर कारखान्यांकडून स्पष्ट भूमिका घेतली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता नाराजी आहे.

महापुरामुळे उसाचे नुकसान झाले असल्याने लवकरात लवकर ऊस तुटला जावा, यासाठी बहुतांशी शेतकरी संघटनांकडून आंदोलनाचा पवित्रा घेतला गेला नसल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींकडून सांगितले जात आहे. आंदोलन होत नसल्यामुळे प्रशासनाकडून ऊस दरासाठी बैठक घेण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. ऊस तुटल्यावर पहिला हप्ता १४ दिवसांत देणे बंधनकारक असते. मात्र, अनेक कारखान्यांनी गाळप सुरू होऊन १५ दिवस उलटून गेले तरी दर जाहीर न करताच ऊस तोडणी सुरू ठेवली आहे. अनेक कारखान्यांकडून साखरपोती पूजनही केले गेले आहे. मात्र, दराबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याचे दिसून येते. शेजारील कारखाने किती दर देतात? यानंतर आपला दर जाहीर करू, अशी अनेक कारखान्यांची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे.  
 
ऊसदराकडे शेतकऱ्यांचे लक्ष
राज्यातील सुमारे ८० कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. मात्र, अजून कोणत्याच कारखान्याने उसाला पहिला हप्ता किती? व कधी देणार? याबाबत भूमिका घेतलेली नाही. केंद्र सरकारने साखरेला किमान विक्री मूल्य ३१०० रुपये क्विंटल जाहीर केले असल्याने बहुतांशी कारखान्यांना ‘स्वाभिमानी’ने मागणी केलेला दर देणे शक्य असल्याचे बोलले जात असले तरी कोणत्याही साखर कारखान्यांकडून दर जाहीर केला गेलेला नाही. यामुळे कोणता कारखाना दराची कोंडी फोडणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


इतर बातम्या
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
पूर्णा येथे रेशीम कोषास प्रतिकिलोस ५१५...परभणी : पूर्णा (जि. परभणी) येथील रेशीम कोष...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
सांगली जिल्ह्यातून डाळिंब निर्यातीसाठी...सांगली ः जिल्ह्यातून गतवर्षी ८०० टन डाळिंबाची...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
‘व्हीएसआय’ची आंतरराष्ट्रीय साखर परिषद...पुणे: वसंतदादा साखर संस्थेच्या वतीने आयोजित...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
धोरणात्मक निर्णय, सिंचनाच्या सुविधेमुळे...नवी दिल्ली: धोरणात्मक निर्णय आणि पुढाकार;...
इथेनॉल प्रकल्पासाठी ३६ कारखान्यांनाच...नवी दिल्ली: पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल...