पुणे बाजार समितीत शुकशुकाट

पुणे ः कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती शुक्रवारपासून तीन दिवस बंद ठेवण्यात आल्याने बाजार आवारात शुक्रवारी (ता.२०) शुकशुकाट होता.
पुणे बाजारसमितीत असा शुकशुकाट होता
पुणे बाजारसमितीत असा शुकशुकाट होता

पुणे  ः कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती शुक्रवारपासून तीन दिवस बंद ठेवण्यात आल्याने बाजार आवारात शुक्रवारी (ता.२०) शुकशुकाट होता. हा बंद अडते असोसिएशन आणि कामगार संघटनांनी ठेवला असला, तरी पणन संचालकांच्या आदेशाने बाजार सुरू असणार असल्याने प्रशासनाने शेतकऱ्यांनी शेतमाल आणण्याचे आवाहन केले होते. मात्र एकही गाडी शेतमाल न आल्याने व्यवहार होऊ शकले नाही. 

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता. १९) राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामधील आवाहनानुसार जनता कर्फ्यूमुळे रविवारी (ता. २२) बाजार समिती बंद ठेवण्याचे अडते आणि व्यापारी आणि कामगार संघटनांनी जाहीर केल्याने रविवारी बाजार समिती बंद असणार आहे. शुक्रवारी (ता. २०)  बंदच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम राबवली. या वेळी बाजार आवारात सर्व कचरा काढून सर्वत्र कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com