एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...
एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...

एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...

पुणे ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अडचणीत आले आहे. त्यावर मात करण्यासाठी महामंडळाच्यावतीने एसटीचे बसचे ट्रकमध्ये रूपांतर करून शेतीमाल वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सुमारे २५० आगाराअंतर्गत असलेल्या ६०० बस स्थानकांवरून ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अडचणीत आले आहे. त्यावर मात करण्यासाठी महामंडळाच्यावतीने एसटीचे बसचे ट्रकमध्ये रूपांतर करून शेतीमाल वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सुमारे २५० आगाराअंतर्गत असलेल्या ६०० बस स्थानकांवरून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. 

सध्या महामंडळाकडे एकूण १४ हजार ५०० एसटी बसेस आहेत. त्यापैकी सुमारे ३ हजार बसेसनी महामंडळाने ठरवून दिलेल्या विहित आयुर्मान म्हणजेच दहा वर्षे व साडे सहा लाख किलोमीटर अंतर पूर्ण केले आहे. या बसचे रूपांतर ट्रकमध्ये करून त्या शेतमाल वाहतुकीकरिता सेवेत दाखल होणार आहे. त्याचप्रमाणे महामंडळाकडे २७८ ट्रक असून त्यापैकी १५३ ट्रक हे बंदिस्त आहेत. उपलब्ध असलेल्या बंदिस्त ट्रकचे आयुर्मान तपासले असता २५ ट्रकचे आयुर्मान हे १० ते १५ वर्षांपर्यंत आहेत. त्यामुळे या बंदिस्त ट्रकचाही शेतीमाल वाहतुकीसाठी वापर करता येणार आहे.

राज्य महामंडळाच्या निर्णयानुसार एसटी बसला किलोमीटरमागे ४२.४ रुपये इतका खर्च येत होता. सध्या मालवाहतुकीसाठी २८ रुपये प्रति किलोमीटर दर आकारून त्यावर १८ टक्के जीएसटी आकारण्याचे नियोजन आहे. एसटी ट्रकची वाहतूक क्षमताही ८ ते ९ टनांची असल्याने वाहतुकीचा दर निश्चित करून ही सेवा सुरू केली आहे, अशी माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com