Farming agricultural Business transport of agricultural commodities through ST Buses pune Maharashtra | Page 2 ||| Agrowon

एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 मे 2020

पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अडचणीत आले आहे. त्यावर मात करण्यासाठी महामंडळाच्यावतीने एसटीचे बसचे ट्रकमध्ये रूपांतर करून शेतीमाल वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सुमारे २५० आगाराअंतर्गत असलेल्या ६०० बस स्थानकांवरून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. 

पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अडचणीत आले आहे. त्यावर मात करण्यासाठी महामंडळाच्यावतीने एसटीचे बसचे ट्रकमध्ये रूपांतर करून शेतीमाल वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सुमारे २५० आगाराअंतर्गत असलेल्या ६०० बस स्थानकांवरून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. 

सध्या महामंडळाकडे एकूण १४ हजार ५०० एसटी बसेस आहेत. त्यापैकी सुमारे ३ हजार बसेसनी महामंडळाने ठरवून दिलेल्या विहित आयुर्मान म्हणजेच दहा वर्षे व साडे सहा लाख किलोमीटर अंतर पूर्ण केले आहे. या बसचे रूपांतर ट्रकमध्ये करून त्या शेतमाल वाहतुकीकरिता सेवेत दाखल होणार आहे. त्याचप्रमाणे महामंडळाकडे २७८ ट्रक असून त्यापैकी १५३ ट्रक हे बंदिस्त आहेत. उपलब्ध असलेल्या बंदिस्त ट्रकचे आयुर्मान तपासले असता २५ ट्रकचे आयुर्मान हे १० ते १५ वर्षांपर्यंत आहेत. त्यामुळे या बंदिस्त ट्रकचाही शेतीमाल वाहतुकीसाठी वापर करता येणार आहे.

राज्य महामंडळाच्या निर्णयानुसार एसटी बसला किलोमीटरमागे ४२.४ रुपये इतका खर्च येत होता. सध्या मालवाहतुकीसाठी २८ रुपये प्रति किलोमीटर दर आकारून त्यावर १८ टक्के जीएसटी आकारण्याचे नियोजन आहे. एसटी ट्रकची वाहतूक क्षमताही ८ ते ९ टनांची असल्याने वाहतुकीचा दर निश्चित करून ही सेवा सुरू केली आहे, अशी माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली. 


इतर अॅग्रो विशेष
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात...सोलापूर ः  आषाढी यात्रेच्या कालावधीसाठी श्री...
बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेचा कारभार...नागपूर ः ‘शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे...
राज्यात पावसाचा कमी अधिक जोर पुणे : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज वादळी...पुणे : कोकणात अनेक ठिकाणी पावसाचा मुसळधार पाऊस...
‘रायरेश्‍वर ’ गटाचा; सेंद्रिय हळदीचा...नाटंबी (ता. भोर, जि. पुणे ) येथील श्री. रायरेश्वर...