Farming agricultural Business Tur procurement status in district Nagar maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात ७१ हजार ६६५ क्विंटल तूर खरेदी

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

नगर  ः नगर जिल्ह्यात नाफेडने सुरु केलेल्या १२ शासकीय खरेदी केंद्रांवर आतापर्यंत ७१ हजार ६६५ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. त्यात सर्वाधिक खरेदी शेवगाव, कर्जत केंद्रांवर झाली आहे. 

नगर  ः नगर जिल्ह्यात नाफेडने सुरु केलेल्या १२ शासकीय खरेदी केंद्रांवर आतापर्यंत ७१ हजार ६६५ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. त्यात सर्वाधिक खरेदी शेवगाव, कर्जत केंद्रांवर झाली आहे. तूर विक्रीसाठी नोंदणीची मुदत संपलेली असली तरी खरेदीसाठी १५ जूनपर्यंत मुदत वाढवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयातून देण्यात आली.

नगर जिल्ह्यात हमीभावाने तूर, हरभरा खरेदी करण्यासाठी बारा ठिकाणी खरेदी केंद्रे सुरु आहेत. आतापर्यंत १६ हजार ५९४ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केलेली आहे. त्यापैकी ११ हजार ५९३ शेतकऱ्यांकडून ७१ हजार ६६५ क्विंटल तूर खरेदी झालेली आहे. अजून पाच हजार शेतकऱ्यांना तूर विक्रीची प्रतिक्षा असून ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर तूर खरेदीला फारसा वेग नसला तरी तूर विक्री करायची राहिलेल्या पाच हजार शेतकऱ्यांना संदेश देण्यात आले आहेत.

मात्र त्यातील बहूतांश शेतकऱ्यांनी बाजारात तूर विक्री केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर खरेदीसाठी ३० मे ची मुदत दिली होती. त्यात आता वाढ करुन १५ जून करण्यात आली आहे. तूर खरेदी केलेल्या तीस टक्के शेतकऱ्यांचे पैसे अजून अडकले असल्याचे सांगितले जात आहे. यंदा आतापर्यंत खरेदी शेवगाव, कर्जत केंद्रावर सर्वाधिक तूर खरेदी झाली आहे.
 
केंद्रनिहाय तूर खरेदी (क्विंटल) ः राहुरी ः १०१०, शेवगाव ः १९७७३, मिरजगाव ः २०३२, पाथर्डी ः ९३२२, पारनेर ः ४०७८, नगर ः ४८१३, कर्जत ः ११०६०, खर्डा ः ४६२८, नेवासा ः २१०४, श्रीगोंदा ः ६७३, जामखेड ः ६७५३, टाकळी खंडेश्वरी ः ९०२५


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...