Farming agricultural Business two hundred seventy three crores profit to district bank Pune maharashtra | Agrowon

पुणे जिल्हा बॅंकेला २७३ कोटींचा नफा : रमेश थोरात 

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 एप्रिल 2020

पुणे  ः देशातील जिल्हा बॅंकांमध्ये अग्रगण्य असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस मार्च २०२० अखेर २७३ कोटी २६ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. शेतकरी कर्जमाफीची अनिश्चितता, काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती व ‘कोरोना’चे संकट असे असतानाही १०३ वर्षांच्या इतिहासात बॅंकेस कधीही एवढा मोठा नफा झालेला नव्हता, अशी माहिती पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दिली. 

पुणे  ः देशातील जिल्हा बॅंकांमध्ये अग्रगण्य असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस मार्च २०२० अखेर २७३ कोटी २६ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. शेतकरी कर्जमाफीची अनिश्चितता, काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती व ‘कोरोना’चे संकट असे असतानाही १०३ वर्षांच्या इतिहासात बॅंकेस कधीही एवढा मोठा नफा झालेला नव्हता, अशी माहिती पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दिली. 

याबाबत श्री. थोरात म्हणाले, की मार्च २०२० अखेर बॅंकेची एकूण उलाढाल १६ हजार ९३५ कोटी ६६ लाख रुपये आहे. सभासद संख्या दहा हजार ९२७ आहे. त्यापैकी ९ हजार १९५ सहकारी संस्था व एक हजार ७३२ व्यक्ती सभासद आहेत. बॅंकेचे भाग भांडवल ३१६ कोटी ८ लाख रुपये असून बॅंकेच्या वसुलीच्या संदर्भात कर्जदार संस्थांनी, विविध कार्यकारी संस्थानी व शेतकरी सभासदांनी घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड केल्याने
बॅंकेचा ग्राँस व नेट एनपीए नाबार्डच्या निकषानुसार निश्चित केलेल्या मर्यादेच्या आत आणण्यात यश आले आहे.

मार्च २०२० अखेर नेट एनपीए शून्य टक्के आहे. बॅंकेच्या ठेवी दहा हजार ९७ कोटी ६७ आहे. तसेचबॅंकेने साखर कारखाने, पतसंस्था, वैयक्तिक  कर्जदारांना सहा हजार ८३७ कोटी ९९ लाख रुपयांचा विविध प्रकारचा कर्ज पुरवठा केला आहे. बॅंकेने पाच हजार ९६ कोटी ५९ लाख रुपयांची गुंतवणूक केली असून बॅंकेचे नेटवर्थ ८०६ कोटी ३६ लाख रुपये आहे. तसेच बॅंकेचा सीडी रेशो ६७.७२ टक्के व सीआरएआर १२.५३ टक्के आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, नाबार्डने जिल्हा बॅंकांना लागू केलेल्या विविध आर्थिक निकषांची पूर्तता बॅंकेने केली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण अर्थकारणाच्या, शेतकरी, उद्योजक, पगारदारांच्या आर्थिक गरजा बॅंक पूर्ण करत आहे. 
 
‘२२ कोटींच्या जुन्या नोटा पडून’ 
केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेऊन जवळपास चार वर्षे होत आली आहेत. तरीही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून पाचशे व एक हजार रुपयांच्या सुमारे २२ कोटी २५ लाख रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या गेलेल्या नाहीत. त्या अद्यापही बॅंकेकडे तशाच पडून असून त्या रिझर्व्ह बॅंकेने स्वीकाराव्यात, अशी मागणी श्री. थोरात यांनी केली. 


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...