चिपळूणमधील पापड महोत्सवात दोन लाखांची उलाढाल

चिपळूण येथील पापड महोत्सवास ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला
चिपळूण येथील पापड महोत्सवास ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला

चिपळूण, जि. रत्नागिरी  ः बचत गटांच्या माध्यमातून तालुक्यातील महिला आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हाव्यात, महिला सशक्तीकरणाला चालना मिळावी, यासाठी पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील बचत गटांसाठी शहरातील अण्णासाहेब खेडेकर क्रिडा संकुलात शनिवारी (ता. १४) आणि रविवारी (ता. १५) पापड महोत्सव आयोजित करण्यात आला. महोत्सवात सुमारे दोन लाखांची उलाढाल झाली. येथे विविध प्रकारचे चवदार पापड, लोणची, चटणी व पिठाचे प्रकार उपलब्ध होते.

पंचायत समितीच्या उमेद विभागाने बचत गटातील महिलांसाठी दोनदिवसीय पापड महोत्सवाचे आयोजन केले होते. या महिलांनी तांदूळ पापड, बटाटा पापड, कढीपत्ता पापड, रंगीत कुरडया, टोमॅटो पापड, पालक पापड असे अनेक प्रकारचे पापड महोत्सवात उपलब्ध केले होते. या चविष्ट पापडांची हातोहात विक्री झाली. लसूण, शेंगदाणा, तीळ, कडीपत्ता आदी चटण्याही विक्रीसाठी उपलब्ध होत्या. डांगर पीठ, नाचणी पीठ, कुळीथ पीठ असे पिठांचे विविध प्रकार उपलब्ध होते. तसेच विविध प्रकारची लोणची उपलब्ध होती. 

तालुक्यातील बचत गटांनी एकूण १२ टन हळदीची लागवड केली होती. यातील काही महिलांनी कच्च्या हळदीचे खास लोणचे तयार केले होते. या लोणच्याला ग्राहकांची चांगली पसंती मिळाली. महोत्सवात येणाऱ्या‍ महिला व नागरिकांसाठी बचत गटाच्या महिलांनी खास सोलकढी उपलब्ध केली होती. मुळा पापड, पालक पापड व कढीपत्ता चटणीला ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com