पुण्यात टोमॅटो, शेवग्याच्या दरात वाढ

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २८) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत १० ट्रकने आवकेत वाढ झाली असून, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली टाळेबंदी शिथिल केल्यानंतर बाजार हळूहळू सुरळीत होत आहे.
आषाढी एकादशीनिमित्ताने पुणे बाजारसमितीत झालेली रताळ्यांची आवक
आषाढी एकादशीनिमित्ताने पुणे बाजारसमितीत झालेली रताळ्यांची आवक

पुणे   ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २८) भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत १० ट्रकने आवकेत वाढ झाली असून, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली टाळेबंदी शिथिल केल्यानंतर बाजार हळूहळू सुरळीत होत आहे. आवक आणि मागणीचे प्रमाण संतुलित राहिल्याने दरदेखील सरासरीच होते. टोमॅटो आणि शेवग्याच्या दरात वाढ झाली होती.   

आवकेमध्ये परराज्यातून इंदौर येथून ५ टेम्पो गाजराची, बेंगळुरू येथून १ टेम्पो टोमॅटोची, कर्नाटक, गुजरात येथून ३ ट्रक कोबीची, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून १० टेम्पो हिरवी मिरचीची, कर्नाटक येथून घेवडयाची ४ टेम्पो आणि तोतापुरी कैरीची २ टेम्पो, हिमाचल प्रदेशातून ५ ट्रक मटारची, आग्रा, इंदौर येथून बटाटयाची १६, इंदौर येथून ५ टेम्पो तर मध्य प्रदेशातून लसणाची ८ ट्रक आवक झाली होती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आलेची ८०० गोणी, भेंडी आणि गवारीची प्रत्येकी सुमारे ८ टेम्पो, टोमॅटोची सुमारे ५०० क्रेट, फ्लॉवरची ८ टेम्पो, कोबीची ३ टेम्पो, सिमला मिरचीची ५ टेम्पो, भुईमुगाची सुमारे १०० गोणी, तांबडा भोपळ्याची ८ टेम्पो, कांद्याची सुमारे ४० ट्रक आवक झाली होती. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या दीड तर मेथीच्या २५ हजार जुड्या आवक झाली होती. पालेभाज्यांची आवक वाढली असली तरी कोथिंबिरीच्या आवकेत सुमारे ६० टक्के माल हा पावसाने भिजलेला होता.

फळभाज्यांचे दर (रुपये, प्रति दहा किलो) ः कांदा - ५०-७५, बटाटा -१७०-२३०, लसूण - ५००-८००, आले सातारी - २००-४००, भेंडी १००-२००, गवार - गावरान, सुरती - १५०-२५०, टोमॅटो -२५०-३००, दोडका २००-२५०, हिरवी मिरची - १५०-२५०, दुधी भोपळा - १००-१५०, चवळी -१००-१५०, काकडी -१००-१५०, कारली हिरवी - २००-२५०, पांढरी -१५०-२००, पापडी - १००-१५०, पडवळ -२५०-३००, फ्लॉवर १००-१२०, कोबी -८०-१००, वांगी - १००-२००, डिंगरी - १००-१५०, नवलकोल - ७०-८०, ढोबळी मिरची - २५०-३००, तोंडली- कळी २००-२५०, जाड -९०-१००, शेवगा -४००-४५०, गाजर - इंदौर -१२०-१५०, स्थानिक -८०-१००, वालवर - २००-२५०, बीट ६०-८०, घेवडा -३००-४००, कोहळा १००-१२०, आर्वी -२५०-३००, घोसावळे १००-१५०, मटार परराज्य - ७५०-८००, पावटा ६००-७००, तांबडा भोपळा - ४०-६०, कैरी तोतापुरी - ३००-३५०, सुरण -१८०-२००, नारळ (शेकडा) १०००-१६००, मका कणीस (१० किलो) ६०-१००. 

पालेभाज्यांचे दर (रुपये, शेकडा) ः कोथिंबीर - ३००-१२००, मेथी १०००-१५००, शेपू १०००-१४००, कांदापात ५००-१०००, चाकवत ६००-८००, करडई -५००-८००, पुदिना - ३००-४००, अंबाडी -७००-१०००, मुळे ८००-१०००, राजगिरा - ५००-८००, चुका ५००-८००, चवळई -५००-८००, पालक ५००-८००. 

फूलबाजार : कोरोना टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर फुलांना राज्यासह परराज्यातून मागणी सुरू झाली आहे. मात्र, वाहतुकीच्या समस्या अजूनही असल्याने फुलांना अपेक्षित उठाव नाही. बाजारात चांगल्या दर्जाची फुले उपलब्ध असूनदेखील मागणीअभावी दर कमीच असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

फुलांचे दर (रुपये, प्रतिकिलो) ः झेंडू : २०-५०, गुलछडी : ५-२०, कापरी : २०-४०, शेवंती : ३०-६०, अ‍ॅस्टर : १५-२०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ५-१५, गुलछडी काडी : २०-४०, डच गुलाब (२० नग) : ५०-१२०, लिलि बंडल : ३-४,  जर्बेरा : ५-२०, मोगरा : १५०-२५०. फळांचा बाजार : रविवारी (ता. २८) येथील फळबाजारात संत्री आणि मोसंबीची प्रत्येकी सुमारे २० टन, डाळिंबाची सुमारे १५० टन, पपईची २५ टेम्पो, लिंबाची दीड हजार गोणी, पेरूची २०० क्रेटस्, कलिंगडाची १५ टेम्पो, खरबुजाची ४ टेम्पो आवक झाली होती. 

फळांचे दर : लिंबे (प्रतिगोणी) : ७०-१५०, मोसंबी : (३ डझन) : १००-२८०, (४ डझन ) : ३०-१००, संत्रा : (३ डझन) : १५०-३००, (४ डझन) - ६०-१५०, डाळिंब (प्रतिकिलो) : भगवा : २५-७०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-४०. कलिंगड : ५-१०, खरबुज : १०-२५, पपई : ५-१५, पेरू : २००-४००.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com