Farming agricultural Business workers may close market committee Nagpur Maharashtra | Agrowon

मध्यप्रदेशात कर्मचारी करणार बाजार समित्यांची टाळेबंदी 

विनोद इंगोले
सोमवार, 4 मे 2020

मध्यप्रदेशमध्ये सध्या २५७ बाजार समित्या आहेत. त्यामध्ये एकूण आठ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या आणि बाजार समित्यांकडून चालविण्यात येणाऱ्या शेतकरीहितांच्या योजनांकडे दुर्लक्ष करीत प्रशासनाने व्यापाऱ्यांना मुक्‍त व्यापाराची संधी दिली आहे. याविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्याकरिता सोमवारी (ता.४) संघटनेची बैठक आहे. सुरुवातीला याप्रश्‍नी निवेदन देत सरकारचे लक्ष्य वेधण्यात येईल. त्यावर निर्णय न झाल्यास बाजार समित्यांची टाळेबंदी केली जाईल. 
- ओगिरा पांडे, अध्यक्ष, ॲग्रीकल्चर मंडी बोर्ड ऑफिसर्स एम्प्लॉईज असोसिएशन, भोपाळ, मध्यप्रदेश. 

नागपूर  ः मध्यप्रदेशमध्ये मुक्‍त व्यापाराअंतर्गत सरकारने मॉडेल ॲक्‍ट लागू केला. याव्दारे व्यापाऱ्यांना एकाच परवान्यावर राज्यातील कोणत्याही गावातील शेतकऱ्याकडून शेतीमाल खरेदी करता येणार आहे. यामुळे राज्यातील बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प होऊन कर्मचारी बेरोजगार होतील, या शक्‍यतेने ॲग्रीकल्चर मंडी बोर्ड ऑफिसर्स एम्प्लॉईज असोसिएशनने या निर्णयाचा विरोध करण्याचे ठरविले आहे. भोपाळमध्ये सोमवारी (ता.४) भोपाळमध्ये याअनुषंगाने बाजार समिती कर्मचाऱ्यांची बैठक होत असून यावेळी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. सुरुवातीला याप्रश्‍नी निवेदन देत सरकारचे लक्ष्य वेधण्यात येईल. त्यावर निर्णय न झाल्यास बाजार समित्यांची टाळेबंदी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. 

भावांतर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हमीभावातील फरकाची रक्‍कम देणारे मध्यप्रदेश पहिले राज्य ठरले होते. त्यानंतर याच सरकारने आता मंडी बोर्डचे विभाजन करून मंडी डायरेक्‍टरेट हे नवे पद निर्माण केले आहे. मंडी डायरेक्‍टरेट (बाजार संचालक) या माध्यमातून राज्यातील मुक्‍त व्यापार व्यवस्थेचे संचालन होईल. बाजार संचालकांकडून परवाना घेतल्यानंतर व्यापाऱ्याला राज्यात कोणत्याही गावातील शेतकऱ्याकडून शेतमाल खरेदी करता येईल.

थेट घरून किंवा व्यापाऱ्याच्या गोदामावरही शेतमाल खरेदी करता येईल. या निर्णयाचा ॲग्रीकल्चर मंडी बोर्ड ऑफिसर्स एम्प्लॉईज असोसिएशनने तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेत प्रसंगी बाजार समित्या बंद करण्याची भुमिकाही घेतली आहे. त्यामुळे सरकार विरोधात बाजार समिती कर्मचारी असा संघर्ष पेटण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. मुक्‍त व्यापारामुळे व्यापाऱ्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाही. शेतमाल किती खरेदी केला यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नसेल, शेतकऱ्यांच्या चुकाऱ्यांची हमी देखील राहणार नाही, असेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...