टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील तलाव भरून देण्याची मागणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली  ः दुष्काळग्रस्त पट्ट्यातील लघू आणि मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ३० ते ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी भविष्यात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता असल्याने टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील तलाव भरून द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात पाणीटंचाई भासत असल्याने योजना सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार योजनचे आवर्तन सुरू झाले आहे. टेंभू योजनेचे १९ पंपांद्वारे पाणी दुष्काळग्रस्त पट्ट्यातील मुख्य कालव्याने पुढे जाऊ लागले आहे. त्यामुळे उन्हाळी पिके, ऊस पिकास संजीवनी मिळाली आहे. द्राक्ष, डाळिंब पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी शेततळ्यांमध्ये पाणीसाठा करण्यास सुरवात केली आहे. परंतू मुख्य कालव्यातून पाणी पुढे जात असल्याने केवळ कालव्यालगतच्या शेतीला याचा फायदा होत आहे. सध्या योजनेचे पाणी हे कडेगाव तालुक्यापासून पुढे पोचले आहे.

वास्तविक पाहता कडेगाव, विटा, खानापूर यासह आटपाडी तालुक्यात मध्यम आणि लघू प्रकल्पांत सध्या ३० ते ३५ टक्के इतका पाणीसाठा आहे. दुष्काळग्रस्त पट्ट्यात सध्या पाणीटंचाई असल्याने या भागातील शेतकरी याच तलावातील पाणी शेतीसाठी वापरु लागले आहेत. सध्या पाणीटंचाईची तीव्रता कमी असली तरी, शिल्लक असलेला पाणीसाठा हा पुरेसा नाही. त्यामुळे येत्या महिनाभरात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे. आत्तापासून तलाव भरून देण्यास सुरवात केली तर पाणीटंचाईची तीव्रता कमी होईल.  त्यामुळे तलाव भरून देण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने करावे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

टेंभू उपसा सिंचन योजना सुरू झाली असली तरी आवर्तन किती दिवस सुरू राहणार आहे, याबाबत पाटबंधारे विभागाने अद्याप नियोजन निश्चित केलेले नाही. त्यातच लाभ क्षेत्रातील तलाव भरून देणार की नाही, यासंदर्भात कोणतीही भूमिका स्पष्ट नाही. जिल्हा प्रशासनाने तलाव भरून देण्यासाठी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com