Farming Agricultural Industry extra one lakh quintals seeds available Pune Maharashtra | Agrowon

मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे जादा मिळणार 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 मे 2020

पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले तरी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मागणीपेक्षा एक लाख क्विंटल बियाणे जादा उपलब्ध होईल, असा दावा कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी केला आहे. 

पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले तरी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मागणीपेक्षा एक लाख क्विंटल बियाणे जादा उपलब्ध होईल, असा दावा कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी केला आहे. 

कृषी आयुक्त सुहास दिवसे व गुणनियंत्रण संचालक विजयकुमार घावटे यांनी बैठका घेऊन खरीप बियाण्यांच्या नियोजनाचा आढावा यापूर्वीच घेतला आहे. मुख्य समस्या सोयाबीन बियाण्याच्या पुरवठ्याबाबत होती. मात्र, महाबीजकडून पुरेसा पुरवठा होत असल्याने सोयाबीन उत्पादकांना पुरेसे बियाणे मिळणार आहे. 

“राज्यात कोणत्याही बियाण्याची टंचाई जाणवणार नाही. शेतकऱ्यांच्या आधीच्या हंगामांमधील होणाऱ्या मागणीचा विचार करता सर्व पिकांसाठी एकूण १६ लाख १६ हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. मात्र, खासगी कंपन्या आणि महाबीजकडून चांगले नियोजन झाले आहे. या नियोजनाचा आढावा घेता एकूण १७ लाख २७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मागणीपेक्षाही एक लाख ११ हजार क्विंटल बियाणे जादा मिळेल. परिणामी टंचाई उद्भवणार नाही,” अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राज्याला यंदा साडेदहा लाख क्विंटल सोयाबीन बियाण्याची गरज आहे. सोयाबीन बियाण्यांचा प्रमुख पुरवठादार महाबीज आहे. खासगी कंपन्या व महाबीजच्या ताज्या नियोजनानुसार ११ लाख २४ हजार क्विंटल बियाणे पुरविले जाणार आहे. 

“ गेल्या तीन वर्षांचा सोयाबीन लागवडीचा अंदाज घेता यंदा ४० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होण्याची शक्यता आहे. मात्र, जादा पेरा झाल्यास शेतकऱ्यांनी स्वतःकडील प्रमाणित बियाण्यांपासून तयार केलेले घरचे बियाणे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना घरच्या सोयाबीनचा वापर पुढील दोन हंगामाकरिता बियाणे म्हणून करता येवू शकतो. त्याचा उत्पादनावर काहीही परिणाम होत नाही,” असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे. 

४० टक्के बियाणे बाजारात पोचले 
खरिपासाठी यंदा खासगी बियाणे उद्योगांतून विविध पिकांसाठी ४० प्रमुख कंपन्या बियाणे पुरविणार आहेत. कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, लॉकडाउन असले तरी या कंपन्यांना सध्या कोणतीही समस्या नाही. त्यामुळे गावपातळीपर्यंत पुरवठ्यात अडथळे येण्यासारखी स्थिती नाही. आत्तापर्यंत किमान ४० टक्के बियाणे बाजारात पोचले देखील आहे. “राज्याच्या बाजारपेठांमध्ये उर्वरित ६० टक्के बियाण्यांचा पुरवठा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होत राहील. बियाणे बाजारात एकूण पुरवठ्याच्या ५० टक्के हिस्सा महाबीज व राष्ट्रीय बियाणे महामंडळाचा आहे. उर्वरित ५० टक्के वाटा खासगी कंपन्यांचा आहे,” असे सूत्रांनी स्पष्ट केले. 


इतर अॅग्रो विशेष
कृषी पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचा...नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतमाल काढणीपश्‍चात...
अजून एक `लातूर पॅटर्न’कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर एप्रिल, मे, जून...
सत्त्वयुक्त उत्पादनांची हवी कृषी...माणसाच्या उपभोगासाठी उपयुक्त असलेली जैवविविधता...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...
राज्यातील २५ लाख खातेदारांना साडेसोळा...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
दूध भुकटी योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
जिल्हा बँकांना शासकीय व्यवहार करण्यास...मुंबई : शासकीय निधीची सुरक्षितता लक्षात घेऊन...
राज्यात सावकारांकडून दरमहा १०० कोटींचे...सोलापूर : राज्यात मागील पाच वर्षांत तब्बल ७५२...
नियमनमुक्तीला पुणे महापालिकेचा हरताळपुणेः एकीकडे केंद्र आणि राज्य शासन शेतमाल बाजार...
विदर्भात वादळी पावसाचा अंदाजपुणे: कोकण, घाटमाथ्यावर मॉन्सूनचा पाऊस सक्रिय...
मराठवाड्यात सोयाबीनची सरासरीपेक्षा अधिक...औरंगाबाद : खरिपाच्या पेरण्या जवळपास ८३ टक्के...
कृषी व्यापार अध्यादेशामुळे दिलासापुणे: केंद्राने काढलेल्या ‘कृषी उत्पादने व्यापार...
खानदेश, मराठवाडा, वऱ्हाडात पावसाच्या सरीपुणे : मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने कोकणासह...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
‘सरफेसी' कायदा आहे तरी काय? दिवसेंदिवस बॅंकांच्या थकीत रकमेत वाढ दिसून येत...
लष्करी’ हल्लाखरीप हंगामाच्या सुरवातीलाच राज्यात मका पिकावर...
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने गेल्या काही...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू...