Farming Agricultural Industry fertilizers supply starts Jalgaon Maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा वेगात

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 एप्रिल 2020

जळगाव   ः जिल्ह्यात २०२०-२१ मधील खरिपासाठी रासायनिक खतांचा पुरवठा वेगात सुरू आहे. खतांचा पुरवठा सुरळीत करून घेत त्याची आपापल्या गोदामांमध्ये व इतर भागात साठवणूक करून घ्यावी. ऐनवेळी कुठलीही टंचाई जाणवायला नको, अशा सूचना वरिष्ठ कार्यालयाने कंपन्या, पुरवठादारांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जळगाव   ः जिल्ह्यात २०२०-२१ मधील खरिपासाठी रासायनिक खतांचा पुरवठा वेगात सुरू आहे. खतांचा पुरवठा सुरळीत करून घेत त्याची आपापल्या गोदामांमध्ये व इतर भागात साठवणूक करून घ्यावी. ऐनवेळी कुठलीही टंचाई जाणवायला नको, अशा सूचना वरिष्ठ कार्यालयाने कंपन्या, पुरवठादारांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यात खरिपासाठी तीन लाख २० हजार मेट्रिक टन विविध रासायनिक खतांचा कंपन्यांतर्फे पुरवठा होणार आहे. यातील ९५ ते ९८ टक्के खतांचा पुरवठा रेल्वे रॅकच्या माध्यमातून होईल. रेल्वेची मालवाहतूक व्यवस्था सुरू असल्याने हा खतपुरवठा बऱ्यापैकी झाला आहे. या महिन्याच्या सुरवातीलाच युरियाचे दोन रॅक दाखल झाले. याद्वारे ५५७३ मेट्रिक टन युरियाचा खरिपासाठी पुरवठा झाला आहे. संयुक्त खतांचे रॅकही दाखल झाले असून, पुढील आठवड्यात हा पुरवठा आणखी गतीने होणार आहे. जिल्ह्यात युरियाची अधिक गरज असते.

यामुळे युरियाचा पुरवठा पुरेसा करून घेण्यासाठी कृषी यंत्रणांचे लक्ष आहे. यासंदर्भात पुरवठादार कंपन्यांशी सातत्याने पत्रव्यवहारदेखील झाल्याची माहिती आहे.
शुक्रवारपर्यंत (ता.२४) जिल्ह्यात येत्या खरिपासाठी आठ हजार ९६ टन सुपर फॉस्फेट, ३७७४ टन पोटॅश, डीएपीचा ९४६ टन, अमोनिअम सल्फेटचा ३४९ टन, २०.२०.०० चा ८४४ टन पुरवठा झाला आहे.

 

जिल्ह्यास मंजूर खतपुरवठा (पुरवठा मेट्रिक टनांमध्ये)
युरिया १,११,७२०
सुपर फॉस्फेट ६२,७३०
पोटॅश ६०,०००
डीएपी १२,६९०

 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...