कापूस खरेदीसाठी १८०० कोटींची शासन हमी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : कापूस पणन महासंघास आवश्यक असलेल्या १८०० कोटी रुपयांच्या शासन हमीस बुधवारी (ता. ५) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता िदली.

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून २०१९-२० मध्ये किमान हमीभावाने कापूस खरेदी करण्यात येत आहे. या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यासाठी कापूस पणन महासंघाने बँक ऑफ इंडियाकडून ७.७५ टक्के व्याजदराने घेतलेल्या १८०० कोटींच्या कर्जास ही शासन हमी देण्यात येईल. या शासन हमीवर महासंघास द्यावे लागणारे हमीशुल्क देखील माफ करण्यात येईल.

कापूस पणन महासंघातर्फे २०१९-२०मधील कापूस खरेदीला सुरुवात झाली असून, किमान हमीभावाने एकूण ८५ कापूस खरेदी केंद्रांमध्ये ४८ लाख ५२ हजार क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. ९४ केंद्रांवर कापूस खरेदी सुरु असून, आतापर्यंत २७.०५ लाख क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. सध्या दररोज अंदाजे ६० ते ८० हजार क्विंटल कापूस खरेदी होत आहे. ही आवक लक्षात घेता महासंघाद्धारे या हंगामात ३० ते ३५ लाख क्विंटल कापूस खरेदी अपेक्षित आहे. यासाठी १८०० कोटी रुपयांची गरज आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com