बारामतीत १६ पासून कृषिक प्रदर्शन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

माळेगाव, जि. पुणे  ः बारामती येथील अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत आयोजित ‘कृषिक २०२०’ या कृषी प्रदर्शनाचा प्रारंभ माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथे १६ जानेवारीला होणार आहे. १९ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील.  

चार वर्षांपासून सर्वांत मोठे प्रात्यक्षिकांवर आधारित भव्य कृषी प्रदर्शन म्हणून ‘कृषिक’कडे पाहिले जाते. शेतीसाठी गरज असलेल्या जगभरातील नव्या व जुन्या तंत्रज्ञानाचा धांडोळा या प्रदर्शनात घेतला जाणार आहे. नव्या कृषी संस्कृतीची, कृषी क्रांतीची उज्ज्वल दिशा शोधण्यासाठी शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी केले.

यंदा शेतकऱ्यांनी वैयक्तिक अथवा गटनोंदणीसाठी अॅन्ड्रॉइड मोबाईलवरून कृषिक (krushik) हे अॅप गुगल प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करावे. या ॲपव्दारे नोंदणी केल्यास १६ ते १८  जानेवारी दरम्यान प्रवेश तिकिटावर २० टक्के सूट मिळेल व १९ जानेवारीला मोफत प्रवेश मिळेल. 

यंदाच्या कृषिक प्रदर्शनात अॅक्वापॉनिक्स पद्धतीने (पाण्यावरील) मासे व भाजीपाला उत्पादन, अॅरोपॉनिक्स पद्धतीने (हवेवरील) रासायनिक अवशेषमुक्त भाजीपाला उत्पादन, पॉलीहाउसमधील अंजीर लागवड, त्यांची प्रक्रिया आणि विक्रीव्यवस्था, डच (हॉलंड) तंत्रज्ञानावर आधारित भाजीपाला उत्पादन, इक्रीसॅटने विकसित केलेले तंत्रज्ञान यासह आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती ११० एकर प्रक्षेत्रावर एका छताखाली शेतकऱ्यांना पाहावयास मिळेल. तसेच, प्रदर्शानात ३५० हून अधिक भारतीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांची प्रात्याक्षिके व स्टॉल्स असतील, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सय्यद शाकीर अली यांनी दिली. 

हे आहे यंदाचे मुख्य आकर्षण ‘कृषिक’मधील पशुपक्षी प्रदर्शनात भारतातील अडीच फूट उंचीची सर्वांत लहान गाय पाहावयास मिळेल, तसेच जास्त दूध देणाऱ्या गाईंची स्पर्धा आणि जातिवंत देशी अश्‍वांच्या स्पर्धा हे मुख्य आकर्षण आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com