Farming agricultural Industry News Marathi sugar recovery decrease Nagar Maharashtra | Agrowon

नगर, नाशिक जिल्ह्यात साखर उताऱ्यात दीड ते अडीच टक्क्यांनी घट

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत यंदाच्या गाळप हंगामात साखर उतारा गतवर्षीच्या तुलनेत दीड ते अडीच टक्क्यांनी कमीच आहे. नाशिक जिल्ह्यामधील कादवा सहकारी साखर कारखान्याचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक ११.२९ टक्के आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक १०.७७ टक्के आहे. सर्वात कमी ८.१३ टक्के साखर उतारा शेवगाव तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्याचा असल्याची माहिती नगरच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून देण्यात आली. 

नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत यंदाच्या गाळप हंगामात साखर उतारा गतवर्षीच्या तुलनेत दीड ते अडीच टक्क्यांनी कमीच आहे. नाशिक जिल्ह्यामधील कादवा सहकारी साखर कारखान्याचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक ११.२९ टक्के आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक १०.७७ टक्के आहे. सर्वात कमी ८.१३ टक्के साखर उतारा शेवगाव तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्याचा असल्याची माहिती नगरच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून देण्यात आली. 

यंदा नगर, नाशिक भागात उशिरा पाऊस झाला. त्याचा परिणाम उसासह साखर उताऱ्यावर झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दीड ते अडीच टक्क्यांनी साखर उतारा कमी झाला असल्याचे दिसत आहे. साखर उताऱ्यानुसार उसाला दर दिला जात असल्याने यंदा ऊस उत्पादकांना आर्थिक फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. साखर उतारा कमी झाल्याने त्याचा फटका पुढील वर्षातील साखरेच्या दरावर होणार आहे. 

नगर, नाशिक जिल्ह्यांमध्ये यंदा ३२ पैकी केवळ पंधरा कारखाने सुरू आहेत. नगर, नाशिक जिल्ह्यांसह अनेक भागांत ऊसटंचाई असल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा दोन महिने लवकरच साखर कारखान्यांचे गाळप बंद होईल. नाशिक विभागात आत्तापर्यंत ४६ लाख २६ हजार ६१८ टन उसाचे गाळप झालेले असून ४६ लाख २४ हजार ३७८ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. 
नगर, नाशिक जिल्ह्यांत यंदा दीड ते अडीच टक्क्यांनी साखर उतारा घसरला आहे. गेल्यावर्षी सरासरी सव्वा अकरा टक्के साखर उतारा होता. यंदा आत्तापर्यंत झालेल्या ऊस गाळपानुसार मागील महिन्यात सरासरी साखर उतारा ९.३० टक्के होता, तो या महिन्यात १० टक्के झाला आहे. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत दीड ते अडीच टक्‍क्यांनी साखर उतारा कमी आहे असे नगरच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून सांगितले.   

पुढील वर्षी आर्थिक फटका बसणार 
नगर, नाशिक जिल्ह्यांत उशिरा झालेल्या पावसाचा साखर उताऱ्यावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत असले तरी यंदाच्या साखर उताऱ्यावर पुढील वर्षी एफआरपीचा दर निश्चित होणार आहे. यंदा घसरलेल्या उताऱ्यामुळे पुढील वर्षी आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात साखर उताऱ्यात मात्र काहीशी वाढ झाली आहे.


इतर ताज्या घडामोडी
‘चांगभलं’च्या जयघोषाविना यंदा जोतिबाची...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर ः कोरोना आणि...
नक्षलवाद्यांनीही घेतला कोरोनाचा धसका;...मुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत...
मुंबईत हापूसची आवक वाढली; ५ डझन पेटीस...मुंबई : वाहतुकीतील अडथळे दूर केल्याने मुंबई कृषी...
नांदेड जिल्ह्यात गारपीटीमुळे पिके...नांदेड : जिल्ह्यातील ४० मंडळांमध्ये मंगळवारी (ता....
इचलकरंजीत विक्रेत्यांकडून चाराविक्रीचे...कोल्हापूर : वैरण बाजारात चारा विक्रेत्यांनी...
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी...नांदेड :‘‘‘लॅाकडाऊन’मुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या...
चाकूर तालुक्यात गारपीटीने पिके,...चापोली, जि. लातूर : चाकूर तालुक्यातील धनगरवाडी व...
बंदीवानांनी पिकवला भाजीपालाअकोला ः येथील जिल्हा कारागृहात असलेल्या शेतीत...
नांदेड जिल्ह्यात सहा हजार क्विंटल...नांदेड : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी लॅाकडाऊन...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची पावणे...औरंगाबाद : ‘‘राज्य कापूस पणन महासंघातर्फे...
अकोला पाणी टंचाईच्या उपाययोजना खोळंबल्याअकोला ः एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे ग्रामीण भागात...
अकोला बाजार समितीत गव्हाची टोकन...अकोला ः ‘कोरोना’ विषाणू प्रतिबंधात्मक...
वाडेगावमध्ये शेतकऱ्यांकडून मोफत...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना सहकार्य...
लॉकडाऊनमुळे ओझोनचा थर भरतोय का?सध्या सर्वत्र एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ओझोनचा...
हिंगणघाट तालुक्‍यात सीसीआयकडे थकले...वर्धा ः सीसीआयला कापूस देणाऱ्या हिंगणघाट तालुक्‍...
नेरच्या शेतकऱ्यांची सोन्यासारखी फुले...देऊर, जि. धुळे : जगासह देशात ‘कोरोना’ विषाणूने...
विदर्भात कोरोना बाधितांची संख्या पोचली...नागपूर ः बुलडाणा, अमरावती नंतर नागपुरातील पहिल्या...
पुणे बाजार समितीत ३२५ वाहनांमधून...पुणे : शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या...
इंदापुरातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळपुणे  ः  कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू...
`कोरोना`च्या पार्श्वभूमीवर पुणे...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी...