Farming Agricultural Industry non FAQ cotton issue rise Akola Maharashtra | Agrowon

नाॅन एफएक्यू कापसाचे करायचे काय : शेतकऱ्यांपुढे प्रश्न

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 एप्रिल 2020

शेतकऱ्यांकडे यंदा बहुतांश कापूस नाॅन एफएक्यू दर्जाचा आहे. हा कापूस त्यांनी कुठे विकायचा. शासन घ्यायला तयार नाही. व्यापारी भाव देत नाही. मग हा कापूस जाळून टाकायचा का, अशी परिस्थिती तयार होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अधिकारी, मंत्र्यांशी संपर्क साधावा तर ते  समाधानकारक उत्तर देत नाहीत. शेतकऱ्यांनी काय करावे.
-  विजय मनोहर ताथोड, तळेगाव, जि. अकोला.

अकोला  ः शासनाकडून कापूस खरेदी प्रक्रिया टप्प्याटप्याने सुरु होत असल्याने दिलासा मिळाला असतानाच या केंद्रांवर केवळ एफएक्यू दर्जाचाच कापूस खरेदी होत असल्याने उर्वरित कापसाचे काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. केंद्रांवर गेलेल्या वाहनात एफएक्यू दर्जाचा जितका कापूस असेल  तेवढा घेऊन उर्वरित कापूस परत केला जात असल्याने संताप वाढू लागला आहे. विशेष म्हणजे सध्या खासगी कापूस खरेदी ठप्प असल्याने अधिकच त्रास वाढलेला आहे.

मार्चमध्ये लाॅकडाउन सुरु झाल्यानंतर कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. या आठवड्यात टप्प्याटप्याने ही खरेदी सुरु केली जात आहे. शुक्रवारी (ता. २४) हिवरखेड येथे येथे कापूस खरेदी केंद्रावर गेलेल्या शेतकऱ्यांचे वाहन परत करण्यात आले. शेतकऱ्याने कारण विचारले तर ग्रेडरने दोन ओळीचे पत्र  हातात लिहून दिले.  ५५ क्विंटल कापूस घेऊन गेलेल्या शेतकऱ्याला वाहनाची भाडेपट्टी, हमाली, दिवसभर घेतलेल्या मेहनतीनंतर कापूस परत केल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

यंदा कापसाच्या दर्जाला बसला फटका
आॅक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात वेचणीला आलेला कापूस परतीच्या पावसामुळे ओला झाला होता.  बीटी कपाशीचे संपूर्ण क्षेत्र असल्याने याकाळात वेचणीला येणाऱ्या कापसाचे प्रमाण अधिक असते. यंदा उत्पादित झालेल्या एकूण कापसापैकी पहिल्या दोन ते तीन वेचण्या सोडल्या तर उर्वरित सर्वच कापूस एफएक्यू दर्जाचा नाही. अशा स्थितीत लाखो क्विंटल कापसाचे करायचे काय असा पेच निर्माण झाला आहे. शासकीय खरेदी केंद्रांवर हा कापूस स्विकारला जात नाही. बाजारपेठेत व्यापारी चार ते साडेचार हजार रुपयांप्रमाणे हा कापूस मागतात. शासकीय दर व व्यापाऱ्यांच्या दरात ६०० ते ७५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत तफावत आहे. शिवाय या खरेदीचे चुकारे कुठे १५ दिवस तर कुठे महिनाभराने दिले जातील, असे व्यापारी आधीच स्पष्ट करीत आहेत, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

शेतकरी प्रतिक्रिया
कापूस घेऊन मी खरेदी केंद्रावर गेलो होतो. तेथे ग्रेडरने कापूस पाहिला व नाॅन एफएक्यू असल्याचे सांगत नाकारला.  त्यांनी लेखी लिहून दिले. मला  घरून गाडी भरून नेणे, वाहतुक खर्च व मजुरी असा जवळपास पाच हजार रुपये खर्च आला होता. तो वाया गेला. आम्ही शेतकरी पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी बोललो. त्यांनी शेतकऱ्यांचा कापूस घेऊ व संबंधितांना योग्य आदेश देऊ एवढेच सांगितले.  शासनाने तातडीने तोडगा काढत सरसकट खरेदी केली तरच कापूस उत्पादक शेतकरी तरेल. अन्यथा संकट वाढणार आहे.
- श्यामशील भोपळे, शेतकरी, हिवरखेड, जि. अकोला.

 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...