नाशिक : ‘सह्याद्री’ उपलब्ध करुन देणार आॅनलाईन फळे, भाजीपाला

नाशिक : शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू केलेली सह्याद्री फार्मर्स शेतकरी उत्पादक कंपनी आपल्या सभासदांच्या शेतातून निरोगी फळे आणि भाजीपाला ऑनलाईन मागणी नोंदवल्यास नाशिक, पुणे, मुंबई येथील जवळच्या पिकअप पॉईंटसवर उपलब्ध करून देत आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.
नाशिक : ‘सह्याद्री’ उपलब्ध करुन देणार आॅनलाईन फळे, भाजीपाला
नाशिक : ‘सह्याद्री’ उपलब्ध करुन देणार आॅनलाईन फळे, भाजीपाला

नाशिक : शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू केलेली सह्याद्री फार्मर्स शेतकरी उत्पादक कंपनी आपल्या सभासदांच्या शेतातून निरोगी फळे आणि भाजीपाला ऑनलाईन मागणी नोंदवल्यास नाशिक, पुणे, मुंबई येथील जवळच्या पिकअप पॉईंटसवर उपलब्ध करून देत आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे. ग्राहकांनी ‘सह्याद्री’च्या कोणत्याही स्टोअरवर भाजीपाला आणि फळांची मागणी नोंदवणे आवश्यक आहे. त्यानंतर कंपनी एका आठवड्यांचे साप्ताहिक बास्केट नागरिकांना घरपोच देणार आहे. कंपनीकडून लवकरच नाशिक शहरातील प्रत्येक भागात सेवा देण्यासाठी डिलिव्हरी व्हॅनही सुरू करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी निखिल कातकाडे (७०६६०२०४०७), प्रथमेश चव्हाण (९६०७७३६७७७) यांच्याशी संपर्क साधावा. या सेवेत घरपोच माल दिल्यावरच निवडलेल्या पर्यायाप्रमाणे किंमत अदा करावयाची आहे, असे सांगण्यात आले आहे. 

या अभूतपूर्व संकटात शेतकऱ्यांची कंपनी म्हणून ‘सह्याद्री फार्म’ने प्रशासनाला सहकार्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशाच प्रकारे शासन, प्रशासन व नागरिक यांनी एकत्रितपणे एकमेकांना आधार देवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे.

भाजीपाला व फळे नाशिकमधील आकाशवाणी टॉवर, गंगापूर रोड, गोविंदनगर, नाशिक रोड, तपोवन लिंक रोड, काठे गल्ली, अशोका मार्ग, आनंदवल्ली येथे उपलब्ध होणार आहे.

असे आहेत फळे, भाजीपाला खरेदीचे पर्याय 

  • भाजीपाला बास्केट
  • पर्याय अ: १० किलो भाजीपाला - ५०० रुपये
  • हिरवी ढोबळी मिरची (०.५ किलो), १ कोबी, १ फुलकोबी, कोथिंबीर पॅक (०.५ किलो), मेथी/पालक पॅक (०.५ किलो), लाल कांदा पॅक (०.५ किलो), टोमॅटो पॅक (१ किलो), बटाटा पॅक(२ किलो), गाजर (०.५ किलो), ५ लिंबू, लसूण (०.२५ किलो), काकडी (०.५ किलो), मिरची (०.२५ किलो)
  • . पर्याय ब : ६.५ किलो भाजीपाला - ३५० रुपये  

  • हिरवी ढोबळी मिरची (०.५ किलो), १ कोबी, १ फुलकोबी, कोथिंबीर पॅक (०.२५ किलो), लाल कांदा पॅक (१ किलो), टोमॅटो पॅक (०.५ किलो), बटाटा पॅक (१ किलो), ५ लिंबू , लसूण(०.२५ किलो), काकडी (०.५ किलो), मिरची(०.५ किलो). 
  • फळ बास्केट
  • पर्याय अ : ११किलो - ८०० रुपये
  • सफरचंद (१ किलो), नागपूर संत्री (१ किलो), टरबूज (३.५ किलो), केळी (२ किलो), द्राक्ष (१.५ किलो), डाळिंब (१ किलो), कस्तुरी (१ किलो).
  • पर्याय ब : ७ किलो - ३७५ रुपये
  • नागपूर संत्रा (०.५ किलो), टरबूज (३.५ किलो), केळी (१ किलो), द्राक्ष (१ किलो), डाळिंब (०.५ किलो), कस्तुरी (०.५किलो).
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com