राज्यातील बावीस कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर  : राज्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू अंतिम टप्प्यात येत आहे. फेब्रुवारीच्या अखेरच्या सप्ताहापर्यंत राज्यातील २२ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. औरंगाबाद विभागातील सर्वाधिक १० कारखान्यांचे धुराडे थंडावले आहेत. या खालोखाल पुणे विभागातील चार कारखान्यांनी गळीत हंगाम पूर्ण केला. नांदेड विभाग वगळता इतर सर्व विभागांत कारखाने बंद होण्यास प्रारंभ झाला आहे. आणखी पंधरा दिवसांत कोल्हापूर वगळता अन्य विभागातील साखर कारखाने जलदगतीने बंद होतील, अशी शक्‍यता साखर आयुक्तालयातील सूत्रांनी व्यक्त केली. 

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात गळीत हंगामास प्रारंभ झाला. आकडेवारीनुसार २६ फेब्रुवारीअखेर राज्यात १४५ साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. या कारखान्यांनी आत्तापर्यंत ४४७ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी ११.०१ टक्के उताऱ्यानुसार ४९२.३९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. 

कोल्हापूर विभागाचा साखर उतारा हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात काहीसा सुधारला आहे. विभागाचा सरासरी उतारा १२.०५ टक्के आहे. त्या खालोखाल पुणे विभागाचा ११.०६ तर नांदेडचा १०.५८ टक्के आहे. इतर विभागांचा साखर उतारा ९ ते १० टक्के आहे. सध्या साखर हंगाम हळूहळू अंतिम टप्प्यात येत आहे. औरंगाबाद विभागात दुष्काळी स्थितीमुळे उसाची मोठी कमतरता भासत आहे. परिणामी या विभागात कारखाने वेगाने बंद होत आहेत. औरंगाबादमधील १९ पैकी तब्बल १० कारखाने बंद झाले आहेत. या विभागातील निम्मे कारखाने बंद झाले आहेत. 

कोल्हापूर विभागात सहकारी कारखान्यांच्या उताऱ्यात सुधारणा फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत कोल्हापूर विभागातील सहकारी साखर कारखान्यांच्या सरासरी साखर उताऱ्यात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहाअखेर खासगी कारखान्यांनी साखर उताऱ्यात बाजी मारली होती. त्यांचा सरासरी साखर उतारा १२ टक्के होता. आता फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत विभागातील तीन ते चार सहकारी साखर कारखान्यांनी खासगी कारखान्यांना टक्कर देत साखर उतारा १२ टक्क्यांवर राखला आहे. कुंभी कासारी, दुधगंगा वेदगंगा, हुतात्मा, राजारामबापू साखराळे युनिट आदि सहकारी साखर कारखान्यांचा सातत्याने १२ टक्क्यांच्या पुढे साखर उतारा राहिला आहे.   

गाळप हंगाम स्थिती
विभाग सुरू कारखाने  ऊस गाळप (लाख टन)  साखर उत्पादन (लाख क्विंटल) उतारा (टक्के) बंद कारखाने
कोल्हापूर    ३५ १५३.१५  १८४.५९ १२.०५  
पुणे  ३० ११५.७६  १२८.०४  ११.०६ 
सोलापूर   २७  ६२.४५ ६२.३५ ९.९८
नगर  १६ ५१.५९  ५२.४८ १०.१७ 
औरंगाबाद  १९ ३२.९० ३२.२० ९.७९ १०
नांदेड १३ २४.१८ २५.५९ १०.५८  -
अमरावती ३.९१ ३.९७ ९.५७ 
नागपूर    ३  ३.३२  ३.१७  ९.५७ -

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com